माहेश्वरी हडको प्रभागतर्फे महिला दिन साजरा औरंगाबाद :- जागतिक महिला दिनानिमित्त माहेश्वरी हडको प्रभागतर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला महिलांचा उत्सर्फुत प्रतिसाद मिळाला. डेन्टल सर्जन डॉ.राखी सावंत यांनी डेन्टल अवेअरनेस मध्ये दातांची कशी काळजी घ्यावी याविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच दातांची तपासणी करून महिलांमध्ये याबद्दल जागरूकता उत्पन्न केली. तसेच सिडको हडको महिला मंडळाच्या माजी अध्यक्षा लता बाहेती व सरला मुंदडा यांचा ही प्रभागातर्फे सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी स्वप्ना राठी, दिपाली लड्डा, भाग्यश्री बाहेती, सुनंदा दाड, राखी केला, रसिका टवाणी, दिपाली काबरा, दिपाली साबू, अलका बाहेती व अनिता दरक यांनी परिश्रम घेतले.