शाहू महाराजांचा स्त्रीहिंसाविरोधी कायदा हिंदू कोड बिलाची नांदी – प्रा. उमेश बगाडे जालना-भारतीय समाजव्यवस्थेत स्त्रीयांवरील हिंसेला धार्मिक अधिष्टाण असल्याने ती नैसर्गिक असल्याचा समाज होता. सर्व धर्मांनी स्त्रियांचे मानुषपण नाकारल्याने ही हिंसा पराकोटीची होती. पुâले-ताराबाई शिंदे यांच्या विचार परंपतेतून स्त्रियांवरील हिंसेला वाचा फोडल्याने छत्रपती शाहू महाराजांनी १९१९ मध्ये स्त्री हिसेला प्रतिबंधक करणारा कायदा तयार करत त्यांचे माणुपण मान्य केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शाहू महाराजांच्या विचाराचा वारसा पुढे चालू ङ्खेवीत हिंदू कोड बील तयार करून भारतीय स्त्रीमुक्तीचा जाहिरनामाच तयार केला. त्यामुळे शाहू महाराजांचा कायदा हा हिंदू कोडबिलाची नांदीच असल्याचे प्रतिपादन प्रा.डॉ.उमेश बगाडे यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराङ्गवाडा विद्यापीङ्गातील ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास वेंâद्राच्या वतीने आयोजित मुक्ता साळवे व्याख्यानमालेत स्त्रीहिंसेला प्रतिबंध करणारा शाहू महाराजांचा कायदा या विषयावर ते बोलत होते. यावेळी विचारमंचावर सामाजिक कार्यकत्र्या मंगला खिवंसरा, प्रा.प्रमोद हिरोडे यांची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलतना डॉ.बगाडे यांनी स्त्रियांवरील हिंसा ही नेमकी येते कोङ्गून, या हिंसेला कोणते अधिष्ठाण आहे, याबाबत सैधांतिक मांडणी केली. जगातील सर्वच धर्मांनी स्त्रीयांना दुय्यम ङ्खरवून तिचे मानुषबण नाकारले. पुरुष हा स्वामी तर स्त्री ही दास्याच्या भूमिकेतच राहिली पाहिजे, अशा पित्तसत्ताक समाजाचा आग्रह राहिला. त्यामुळे ज्या देशात पित्तसत्ताक समाज आहे त्या ङ्गिकाणी स्त्रियांवर हिंसा होते. युरोपामध्ये कामगार वर्गातील स्त्रियांवर हिंसा अधिक आहे. मात्र भारतीय समाजामध्ये स्त्री हिंसा ही पराकोटीची असण्याचे अनेक कारणांचा उहापोह डॉ. बगाडे यांनी केला. धर्माशास्त्रांनीच स्त्रियांवरील हिंसेला तात्वीक अधिष्ठाण दिल्याने ती नैसर्गिक असल्याचे समाज आजही कायम आहे. जात आणि लिंगभाव आणि हिंसा यांच्यातील संबंध डॉ. बगाडे यांनी उलगडून दाखवित अनेक उदाहरणे दिली. जातीची आणि धर्माची प्रतिष्ठा ही स्त्रियांभोवती वेंâद्रीत केल्याने आपल्या जातीची श्रेष्ठता दाखविण्यासाङ्गी तिच्यावर अनेक बंधने लादली. तर दुसNया बाजुला दुसNया जातीवर प्रभुत्व निर्माण करण्यासाङ्गी त्या जातीतील स्त्रियांना हिसेचेलक्ष केले. त्यामुळे १९ व्या शकतात सर्वत्र स्त्रियांच्या हिंसेचे प्रमाण अधिक होते. याच काळात महात्मा पुâले, ताराबाई शिंदे यांनी स्त्रियांचे मानुषपण सिद्ध करीत या हिंसेला तात्वीक आणि सैधातिक विरोध केला. पुâले-ताराबाई शिंदे यांच्या विचाराचां प्रभाव असलेल्या शाहू महाराजांनी १९१९ मध्ये स्त्री हिंसाविरोधी प्रतिबंधक कायदा करून नव्या युगाची सुरुवात केली. यानंतर शाहू महाराजांनी स्त्रीयांबाबत विविध कायदे वेâले. शाहू महारांजांच्या विचारांचा वारसा पुढे नेणाNया डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासमोर संविधान लिहीतांना शाहू महाराजांचे कायदे होते. त्यातून हिंदू कोडबीलाची निर्मिती झाली. हिंदू कोडबीलाच्या माध्यमातून संविधानात स्त्रियांचे मानुषपण जपण्याचा, समानतेचा अधिकार देण्याचा प्रयत्न बाबासाहेबांनी केला. परंतु त्याकाळात हे कायदे मंजूर झाले नाहीत. आता हे कायदे तुकड्यातुकड्याने पारीत केले जात ाहेत. मंगल खिवंसरा यांनी वर्तमान काळातील विविध उदादरणे देत मांडणी केली. शाहू महाराजांचे तत्कालीन कायदे आणि आताचे कायदे यामधील तफावत त्यांनी दाखवून दिली. समतायुक्त समाजासाङ्गी युवकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रा.प्रमोद हिरोडे यांनी शाहू महाराजांच्या स्त्री हिंसाविरोधी कायद्याच्या विविध कलमांवर प्रकाशटाकला. शाहू महाराजांनी वेâलेले अनेक कायदे त्यांच्या दूरदृष्टीपणाची साक्ष देतात, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास वेंâद्राच्या संचालक प्रा.निर्मला जाधव यांनी केले. पाहुण्यांचा परिचय समर आजाजी, संचलन कोमल जाधव तर आभार प्रदर्शन चित्रा मोरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीेतेसाङ्गी प्रा. आश्विनी मोरे, प्रा. मंजुश्री लांडगे, डॉ.सविता बहिरट, संतोष लोखंडे, विकास टाचले, संजय पौळ, रवी गाडेकर, सागर कोळी, शामल दरंदले, निकीता शिंदे यांच्यासह विभागाच्या विद्याथ्र्यांनी परिश्रम घेतले.