सोनी सबवरील जीजाजी छत पर हैं या मालिकेने मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांचे प्रेम मिळवले आहे. यातील विनोदी पटकथेने देशभरातील प्रेक्षकांना आकर्षून घेतले आहे. आगामी भागांमध्ये, मुरारी करुणावर (सोमा राठोड) आरोप करणार आहे. करुणाला आणखी एक मूल आहे, जे याला माहीत नव्हतं, असा मुरारीचा आरोप आहे.

 

घरातील सर्वच सदस्यांना, अगदी मुरारी (अनुप उपाध्याय), पंचम (निखिल खुराना) आणि ईलायची (हिबा नवाब) या सगळ्यांनाच करुणाचं वागणं काहीसं संशयास्पद वाटू लागतं. ती कुठे जाते, कुठे असते याबद्दल संशयाचे ढग गोळा होऊ लागतात. पंचमला कळतं की करुणा एका लहान मुलाला भेटण्यासाठी घरी खोटं बोलून जातेय आणि ते मुल करुणाला अम्मा म्हणतंय. पंचमने पकडल्यावर ती त्याला दुकानातून पैसे चोरायला सांगते. मात्र, ईलायची आणि मुरारी आपल्याला पाहत आहेत, हे तिला माहीतच नसतं. मुरारी यामुळे फारच दुखावतो. आपल्या बायकोने आपल्याला फसवलं असं त्याला वाटतं. मात्र, करुणा असं काही करेल यावर ईलायचीचा विश्वास बसत नाही.

 

करुणा खरंच मुरारीला फसवते आहे का? तिला खरंच आणखी एक मूल आहे का?

 

करुणाची भूमिका साकारणाऱ्या सोमा राठोड म्हणाल्या, "सोनी सबवरील जीजाजी छत पर है मधील माझा करुणा म्हणून झालेला प्रवास सुरुवातीपासूनच उत्कंठापूर्ण आहे. आईची भूमिका साकारताना त्याला विनोदाची झालर देणं सोपं नाही. आम्ही यापुढेही प्रेक्षकांचं मनोरंजन करत राहू आणि येत्या भागांमध्ये तर उत्कंठा फारच वाढणार आहे."

 

पाहत रहा जीजाजी छत पर मैं दर सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता फक्त सोनी सबवर