जालना शहरात अप्पर पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन भाजप नगरसेविकेच्या पती आणि शिवसेनेचा माजी नगरसेवक या दोघांना शस्त्रसाठा व चंदनासह घेतले ताब्यात. जुन्या जालन्यातील कैकाडी मोहल्ला, माळीपुरा आणि चमन परिसरात जोरदार कोम्बिंग.भाजप नगरसेविकेच्या पतीच्या घरात सापडल्या तीन तलवारी.शिवसेनेच्या माजी नगरसेवकाच्या घरातून चंदन जप्त करण्यात आले.जुन्या जालन्यातील कोम्बिग ऑपरेशन आटोपून फौजफाटा नवीन जालन्यात आला,यामुळे गुन्हेगाराचे धाबे दणाणले असून,अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्यासह LCB चे पोनि.राजेंद्र गौर, ADS चे पोनि.यशवंत जाधव, पोनि. साईनाथ ठोंबरे, पोनि.किशोर बोर्डे पाटील, पोनि.महादेव राऊत, पोनि. बाळासाहेब पवार, ATC चे सपोनि. सीताराम मेहेत्रे यांच्यासह विविध विभागाचा आणि ठाण्याचा फौजफाटा कोम्बिंग ऑपरेशनमध्ये सहभागी झाला होता. गणपतीउत्सव आणी मोहरमच्या दरम्यान जालना शहरात अप्रिय घटना थांबवण्यासाठी जालना पोलीसांनी सोमवारी नवीन व जुन्या जालन्यात हे कोम्बिंग ऑपरेशन सुरू केलेहोते या काॅम्बिंग ऑपरेशन मध्ये एकून आठ तलवारी दोन गुप्त्या एक कोयता जप्त केला आहे सायंकाळी पाच वाजता शहरातील कैकाडी गल्लीत सर्च ऑपरेशन दरम्यान पोलीसांनी तीन तलवारी एक गुप्ती जप्त केली व जालनायेथील मंगला बाजार भागांत ऑपरेशन दरम्यान पाच तलवारी आणी गुप्ती पोलीसांनी जप्त हे सर्च ऑपरेशन अप्पर पोलिस अधीक्षक समाधान पवार यांच्या नेतृत्वाखाली चालवण्यात आले होते.