औरंगाबाद :- औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेच्या मैदानावर एशियन क्रिकेट प्रीमियर लीग पर्व-४ खेळविण्यात आले. स्पर्धेचे उदघाटन हॉस्पिटलचे संचालक डॉ. शोएब हाश्मी,डॉ सचिन झंवर,डॉ राजीव नाईक व डॉ अजय दंडे यांनी केले.या वेळी डॉ.उज्वला दहिफळे,डॉ अविनाश त्रिभुवन,डॉ विजय वालतुरे, डॉ गीतेश दळवी,डॉ अल्ताफ शेख,हर्षवर्धन त्रिभुवन, मोहम्मद नवाझ,सुहास अटकोरे,सतीश सातपुते,संदीप कौर,डॉ रेणुका खरडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.ही स्पर्धा दरवर्षी टेनिस बॉल वर खेळवली जाते या स्पर्धेत प्रत्येक संघात संचालक,डॉक्टर,व्यवस्थापक,साफसफाई कर्मचारी व एक महिला खेळाडू असणे बंधनकारक असते.या स्पर्धे मुळे हॉस्पिटल प्रशासन मैदानी खेळांना प्रोत्साहन देतात व कर्मचाऱ्यांची एकता दिसुन येते.या वर्षी या स्पर्धेत ५ संघ सहभागी झाले होते त्यात एशियन चॅम्पियन संघ विजेता ठरला आणि फ्रेंडशीप चषक एशियन हॉस्पिटल संघाने गजानन हॉस्पिटल संघाला पराभूत करून जिंकला.स्पर्धेत एशियन स्ट्राईकर्स, एशियन रायडर्स आणि एशियन टायगर्स संघ सहभागी झाले होते.या स्पर्धेचे नियोजन ऑपरेशन हेड हर्षवर्धन त्रिभुवन यांनी संचालक डॉ शोएब हाश्मी यांच्या मार्गदर्शनाखाली केले.