बावले उतावले मालिकेतील फुंटीने जिंकली 'खादी सायकल कॉम्पिटीशन' मध्यप्रदेशातील एका लहानशा गावातील एक प्रेमकथा सादर करणारी सोनी सबवरील मालिका “बावले उतावले”ला त्यातल्या गमतीशीर पात्रांसाठी आणि धम्माल कथेसाठी प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभतो आहे. प्रत्येकजण गुड्डू (पारस अरोरा) आणि फुंटी (शिवानी बदोनी) यांचे लग्न लावून देण्यासाठी प्रयत्न करतो आहे. परंतु त्यात एक समस्या निर्माण झाली आहे, ज्यामुळे त्यांच्या लग्नाला आणखी उशीर होतो आहे. आपल्या कुटुंबाच्या आर्थिक स्थितीच्या काळजीपोटी फुंटीने “खादी सायकल स्पर्धेत” भाग घेऊन स्पर्धेतली रक्कम जिंकून आपल्या कुटुंबाला मदत करायचे ठरवले आहे. गुड्डूला हे पसंत नाही. फुंटी एक स्वावलंबी मुलगी असल्याने ती या स्पर्धेत भाग घेते आणि स्पर्धा जिंकते. दुस-या बाजूला फुंटीच्या पूर्व प्रियकराचे वडील, जे सिरीयल किलर आहेत, त्यांना गुफू म्हणजेच गुड्डू आणि फुंटीच्या लग्नाबद्दल समजते आणि ते स्वतःच्या मुलाच्या आनंदासाठी गुड्डूला मारण्याची शपथ घेतात. या सर्वांपासून अनभिज्ञ असलेला गुड्डू फुंटीला, तो तिला पाठिंबा का देऊ शकला नाही हे समजवण्याच्या प्रयत्नात गुंतला आहे गुड्डू सिरीयल किलरच्या हल्ल्यातून वाचेल का? सगळ्या अडचणींवर मात करून फुंटी आणि गुड्डू लग्‍न करण्यात यशस्वी होतील का ? फुंटीची भूमिका साकारणारी शिवानी बदोनी म्हणते, “फुंटी एक स्वावलंबी मुलगी आहे, त्यामुळे ती इतरांकडून आर्थिक मदत घ्यायला तयार नाही. स्पर्धा जिंकल्यानंतर आपण आपल्या आई वडिलांना मदत करू शकलो याचा तिला अभिमान आहे. या सायकल स्पर्धेच्या चित्रिकरणादरम्यान मला फार मजा आली आणि मला खात्री आहे की, प्रेक्षकांनाही पुढे काय होणार आहे ह्याची उत्सुकता वाटेल.'' गुड्डूची भूमिका साकारणारा पारस अरोरा म्हणतो, “फुंटीला आपल्या कुटुंबासाठी मदत करण्याच्या प्रयत्नासाठी सपोर्ट न केल्याबद्दल गुड्डूला अपराधी वाटते आहे आणि आता त्यासाठी तो तिला हरप्रकारे समजावण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याचवेळी गुड्डूला कल्पनाही नाही की, त्याचा जीव धोक्यात आहे. पुढे काय घडणार आहे, गुफूचे लग्न होऊ शकेल की नाही ? हे पाहणे प्रेक्षकांसाठी निश्चितच मनोरंजक असणार आहे.''