रक्तगट जुळत नसूनही ६० वर्षांच्या रुग्णावर मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी · दाता व ग्राहकाचा रक्तगट जुळत नसताना मूत्रपिंड प्रत्यारोपण अपवादात्मक नाही पण भारतातील निवडक ठिकाणीच अशा परिस्थितीत शस्त्रक्रिया होतात · डॉ. चंदन म्हणतात, डायलिसिसच्या तुलनेत प्रत्यारोपणामुळे रुग्णाचे आयुष्य अनेक वर्षांनी वाढू शकते मुंबई- मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ड्टहॉस्पिटलमधील नेफ्रोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. चंदन चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ६० वर्षे वयाच्या रुग्णावर दात्याचा रक्तगट वेगळा असूनही वृक्कीय (रेनल) मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केली. पेअर्ड एक्स्चेंज किडनी डोनेशन (असंगत म्हणजेच मूत्रपिंड न जुळणारे दाते असलेले रुग्ण जुळणाऱ्या मूत्रिपंड दात्यांशी अवयवदानाची अदलाबदल करतात) जगभरात वाढत असले, तरीही भारताने अद्याप या प्रकाराचा अपेक्षित वापर क्षमतेच्या तुलनेत केलेला नाही. ६० वर्षांचे नटवर (नाव बदलले आहे) मूत्रपिंडांच्या तक्रारींमुळे मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ड्टहॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी आले. नटवर यांचे कुटुंबीय काहीशा गोंधळलेल्या मन:स्थितीत होते, कारण, श्री. नटवर यांच्या पत्नीचा रक्तगट त्यांच्याशी जुळत नव्हता आणि त्यांच्यासाठी त्याच अवयवदात्या होत्या. पत्नीचा रक्तगट एबी पॉझिटिव्ह तर रुग्णाचा रक्तगट ए पॉझिटिव्ह होता. डॉ. चंदन आणि त्यांच्या पथकाने शस्त्रक्रियापूर्व मूल्यांकन करून रुग्णाला प्रत्यारोपणासाठी तयार केले. यामध्ये कोणतीही गुंतागुंत होऊ नये म्हणून कोरोनरी अँजिओग्राफीही करण्यात आली. मूत्रपिंडदात्याच्या तंदुरुस्तीचे परीक्षण करण्यात आले तसेच त्यांच्या अन्य चाचण्याही करण्यात आल्या. डॉक्टरांनी रुग्णाला रिटक्सिमॅब हे इंजक्शन दिले, जेणेकरून अँटि ब्लड ग्रुपला अँटि बॉडीजमध्ये दडपून ठेवता येईल. त्यानंतर प्लाझमा फेरोसिस करून वेगळ्या रक्तगटाविरुद्ध तयार होत असलेली प्रतिद्रव्ये शरीराबाहेर काढण्यात आली. सर्व काही स्वीकारण्याजोगे झाल्यानंतर प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. मूत्रपिंड प्रत्यारोपण फेब्रुवारी २०१९ मध्ये करण्यात आले. रुग्ण शस्त्रक्रियेनंतर वेगाने बरा झाला आणि शस्त्रक्रियेदरम्यानही कोणतीही गुंतागुंत न होता सर्व काही सुरळीत पार पडले. मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ड्ट हॉस्पिटलमधील नेफ्रोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. चंदन चौधरी म्हणाले, “जिवंत मूत्रपिंड दाता ग्राहकाला (रुग्णाला) अनुकूल नसेल तर अशा परिस्थिती पेअर्ड किडनी ट्रान्सप्लांट (याला स्वॅप ट्रान्सप्लाण्ट असेही म्हणतात) केले जाते आणि मग अन्य दाता/ग्राहकाच्या आणखी एका जोडीसोबत मूत्रपिंडाचे हस्तांतर केले जाते. पण ज्याच्यावर प्रत्यारोपण करायचे त्याचा रक्तगट ओ पॉझिटिव्ह असेल तर या तंत्राचा अवलंब केला जात नाही. दाता व ग्राहकाचा रक्तगट वेगळा असताना शस्त्रक्रिया होणे फारसे अपवादात्मक नाही पण भारतात मात्र काही ठिकाणीच अशा पद्धतीने शस्त्रक्रिया केली जाते. डायलिसिसवर असलेल्या रुग्णाचे आयुष्य ५ वर्षांनी वाढते तर प्रत्यारोपणामुळे डायलिसिसच्या तुलनेत अनेक वर्षे आयुष्या वाढते.” रुग्ण श्री. नटवर म्हणतात, “वेगळे रक्तगट असूनही मी व माझी पत्नी प्रत्यारोपण कसे करू शकू हे डॉ. चंदन चौधरी यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे समजले. आता माझी प्रकृती उत्तम आहे.” रक्ताचा प्रकार व ग्राहकाबद्दल समजून घ्यावी अशी माहिती • रक्तगट ए असलेले दाते ए व एबी रक्तगट असलेल्या ग्राहकांना मूत्रपिंड दान करू शकतात • रक्तगट बी असलेले दाते बी व एबी रक्तगट असलेल्या ग्राहकांना मूत्रपिंड दान करू शकतात • रक्तगट एबी असलेले दाते केवळ एबी रक्तगट असलेल्या ग्राहकांनाच मूत्रपिंड दान करू शकतात • रक्तगट ओ असलेले दाते ए, बी, एबी व ओ रक्तगट असलेल्या ग्राहकांना मूत्रपिंड दान करू शकतात (रक्तगट ओ हा सर्वयोग्य दाता समजला जातो. ओ रक्तगटाचे रक्त कोणत्याही रक्तगटाच्या ग्राहकाला अनुकूल ठरते.) म्हणून, • ओ रक्तगट असलेले रुग्ण केवळ ओ रक्तगट असलेल्या दात्यांकडून मूत्रपिंड स्वीकारू शकतात • ए रक्तगट असलेले रुग्ण केवळ ए आणि ओ रक्तगट असलेल्या दात्यांकडून मूत्रपिंड स्वीकारू शकतात • बी रक्तगट असलेले रुग्ण केवळ बी आणि ओ रक्तगट असलेल्या दात्यांकडून मूत्रपिंड स्वीकारू शकतात • एबी रक्तगट असलेले रुग्ण ए, बी, एबी आणि ओ रक्तगट असलेल्या दात्यांकडून मूत्रपिंड स्वीकारू शकतात (एबी हा रक्तगट असलेले रुग्ण युनिव्हर्सल रेसिपिअंट असतात: एबी रक्तगट असलेले रुग्ण अन्य कोणत्याही रक्तगटासोबत अनुकूल असतात.)