सातव्या वेतन आयोगानुसार वेतननिश्चितीबाबतच्या प्रशिक्षणास उपस्थित राहण्याचे आवाहन औरंगाबाद (जिमाका) :- आरंगाबाद विभाग औरंगाबाद अंतर्गत येणाऱ्या सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांना सूचित करण्यात येते की, सातव्या वेतन आयोगानुसार वेतननिश्चिती करणे बाबतचे प्रशिक्षण हे दि. 15 मार्च 2019 रोजी सकाळी 11 ते 2 या कालावधीत मराठवाडा महसूल प्रशिक्षण, प्रबोधिनी औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आले आहे. सदर प्रशिक्षण सत्रास सर्वांनी उपस्थित रहावे, असे वरिष्ठ कोषागार अधिकारी औरंगाबाद यांनी कळविले आहे.