इ. 10 वी परिक्षेच्या कल अभिक्षमता चाचणी अहवालाचे वाटप दि. 15 मार्च रोजी औरंगाबाद (जिमाका) :- मार्च-2019 माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.10वी) परीक्षेच्या कल-अभिक्षमता चाचणी अहवाल वाटप साहित्य नेहमीच्या जिल्हा वितरण केंद्रावर दिनांक 15 मार्च 2019 रोजी सकाळी 11 ते 5 या वेळेत वाटप करण्यात येणार आहे. तरी सर्व मान्यता प्राप्त शाळांच्या मुख्याध्यापकांनी याबाबत नोंद घेवून आपल्या शाळेचा प्रतिनिधी जिल्हा वितरण केंद्रावर साहित्य स्विकारण्यासाठी पत्रासह पाठवावा, असे विभागीय सचिव विभागीय मंडळ, औरंगाबाद यांनी कळविले आहे.