लोकसभा निवडणूक निर्भय, नि:पक्ष, पारदर्शक वातावरणात पाडण्यासाठी यंत्रणांनी समन्वयाने काम करावे -- जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे जालना (जिमाका) :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 चा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असुन लोकसभा निवडणुकी दरम्यान आचारसंहितेचे काटेकोर पालन होण्याबरोबर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी निवडणुकीसाठी नियुक्त सर्व यंत्रणांनी दक्षपणे काम करावे. तसेच निवडणुका निर्भय व नि:पक्षपणे पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय राखून काम करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिले. लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने आचारसंहिता व कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात सर्व संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्री बिनवडे बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्रीमती संगीता सानप, जिल्हा पुरवठा अधिकारी राजीव नंदकर, उप विभागीय अधिकारी केशव नेटके, शशीकांत हादगल यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. जिल्हाधिकारी श्री बिनवडे म्हणाले की, महाराष्ट्र राज्यात चार टप्प्यात मतदान होणार असुन तिसऱ्या टप्प्यामध्ये जालना जिल्ह्यात मतदान होणार आहे. जालना जिल्ह्यात 6 मतदारसंघाचा समावेश असुन यापैकी तीन मतदारसंघ औरंगाबाद जिल्ह्यातील असणार आहेत. अधिसुचना जारी करण्याची तारीख 28 मार्च असुन नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम तारीख 4 एप्रिल राहणार आहे. नामनिर्देशन पत्राची छाननीची तारीख 5 एप्रिल असुन उमेदवारी मागे घेण्याची तारीख 8 एप्रिल असणार