जालन्यात उद्या मोफत मार्गदर्शन कार्यशाळा नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या युवक- युवतींनी लाभ घ्यावा-भेदूरकर जालना (प्रतिनिधी) :- जालना जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांना विविध शासकीय कार्यालयात नोकरीची संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीकोणा तून ज्ञानज्योती एज्युकेशन व पाथ फाईंडर्स पुणे या संस्थेच्या जालना येथील शाखेच्या संयुक्त विद्यमाने उद्या दि. 13 मार्च बुधवार रोजी सकाळी 10 वाजता जालना शहरात मोफत मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे येथील ज्ञानज्योती एज्युकेशन व पाथ फाईंडर्स या नामांकित शिकवणी वर्गातर्फे एमपीएस्सी, युपीएस्सी तसेच केंद्र व राज्य शासनाच्या सेवेतील विविध पदांसाठी स्पर्धा परिक्षेची तयारी करुन घेण्यात येते. या नामांकित संस्थेत शिकवणीसाठी प्रवेश घेतलेले हजारो विद्यार्थी स्पर्धा परिक्षेत यशस्वी होऊन राज्यातील विविध शासकीय कार्यालयात मोठ्या हुद्यावर कार्यरत आहेत. पुणे, यवतमाळसह अनेक जिल्ह्यात घवघवीत यश संपादन करुन नावलौकीक मिळवलेल्या ज्ञानज्योती एज्युकेशन व पाथ फाईंडर्स च्या संचालकांनी जालना येथेही काही दिवसापूर्वीच शाखा सुरु केली आहे. जालना जिल्ह्यासह परिसरातील होतकरु व गुणवंत विद्यार्थ्यांना नोकरीची संधी निर्माण करुन देण्यासाठी भोकरदन नाक्याजवळील दैनिक दुनियादारी कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर सुरु करण्यात आलेल्या या शाखेतर्फे उद्या दि. 13 मार्च बुधवार रोजी सकाळी 10 वाजता मोफत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत ज्ञानज्योती एज्युकेशनचे संचालक तथा वित्त व लेखाधिकारी श्री. विशाल भेदूरकर आणि इतिहास व राज्यव्यवस्था या विषयाचे एमपीएसस्सी प्रा. श्रीकांत आडे (पुणे) हे उपस्थित राहून बेरोजगार तरुणांना राज्य व केंद्र शासनातील विविध कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी पदासाठीच्या संपूर्ण परिक्षेसंदर्भात सखोल मार्गदर्शन करणार आहेत. या मोफत कार्यशाळेचा बेरोजगार तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.