महावितरण कार्यालयात यशवंतराव चव्हाण यांची जयंती औरंगाबाद :- महावितरण प्रादेशिक कार्यालय औरंगाबाद व महावितरण परिमंडल कार्यालय औरंगाबाद येथे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेला सहव्यवस्थापकीय संचालक श्री ओम प्रकाश बकोरिया यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी प्रभारी मुख्य अभियंता— गुणवत्ता व नियंत्रण श्री देवेंद्र जायस्वाल, अधिक्षक अभियंता श्री उदयपाल गाणार, सहायक महाव्यवस्थापक — मानव संसाधन श्रीमती शिल्पा काबरा, प्रभारी सहमुख्य औघोगिक संबंध अधिकारी श्री प्रमोद राजेभोसले, कार्यकारी अभियंता श्री एकनाथ वाघ, अभियंते, अधिकारी, कर्मचारी, महिला, विविध संघटनेचे पदाधिकारी यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.