विकास जिवरग यांना राज्यस्तरीय शिक्षणरत्न पुरस्कार कन्नड प्रतीनिधी .औराळा ता कन्नड येथील विकास जिवरख यांनी अगदी कमी वयात शैक्षणिक क्षेत्रात आपले स्वतः बरोबर आपल्या भागाचे, आपल्या गावाचे नाव लौकिक केले, राधा-गोविंद शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना उत्कृष्ट सेवा देताना सामाजिक बांधिलकी ठेवून नावीन्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून औराळा, जेहुर व कोळवाडी या ग्रामीण/दुर्गम तसेच डोंगरी भागात दर्जेदार, शिस्तयुक्त शिक्षण कसे देता येईल यासाठी नेहमीच प्रयत्नशील असणारे गेल्या अनेक वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली. या कार्याबद्दल *श्री. विकास जिवरख सर* यांना अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, पुणे यांच्या वतीने गोवा येथे आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात *राज्यस्तरीय शिक्षणरत्न पुरस्कार-२०२१* खासदार संसदरत्न श्री सुनील गायकवाड, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद चे अध्यक्ष श्री शरद गोरे, जिल्हा परिषद अध्यक्ष श्री राहुल लोणीकर, श्री अविनाश औटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्याबद्दल त्यांचे कॉंग्रेस कमिटी जनरल सेक्रेटरी मा.आ.नामदेवरावजी पवार,जिल्हा परिषदेचे सदस्य किशोर आबा पवार, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संजय खंबायते, कॉंग्रेस तालुकाध्यक्ष बाबासाहेब मोहिते, मा.सभापती काकासाहेब तायडे, प्रतिष्ठित व्यापारी रमेश खंडेलवाल, कैलास शेठ खंडेलवाल, सिताराम तात्या वारे, राजेशजी सराफ, देविदास राठोड, उपसरपंच आकाश पगारे, सरपंच सोमनाथ जाधव, सुभाष जिवरख, राजु शिंदे, सुभाष वाघ, सचिन पवार सर, दशरथ सोमासे सर, विलास इंगळे सर, संदीप पवार सर, गोकुळ जिवरख, सुधीर जिवरख, राजेंद्र जिवरख, अनिल निकम, प्रशांत वारे, वैभव पाटील आदींनी अभिनंदन केले.