लसीकरण केंद्राला उपमुख्य कार्यकारी यांची भेट अंबड प्रतिनिधी : अंबड तालुक्यातील किनगाव येथे ता.१२ मंगळवार रोजी उपमुख्य कार्यकारी (सामान्य प्रशासन) जालना वैशाली रसाळ यांनी भेट देऊन सविस्तर माहिती घेतली. जालना जिल्ह्यात मिशन कवच कुंडल मोहीम अंतर्गत कोविड-19 लसीकरण केंद्राला उदीष्ट देण्यात आले होते. यासाठी आरोग्य विभागाचे कर्मचारी,शिक्षक,आशा स्वंयसेविका,अंगणवाडी सेविका,ग्रामपंचायत कर्मचारी यांनी घरोघरी जाऊन लसीकरण साठी जनजागृती करून गाव पुर्ण लसीकरण करावे यासाठी आरोग्य उपकेंद्र किनगाव येथे लसीकरण सुरू आहे. या लसीकरण केंद्राला उपमुख्य कार्यकारी (सामान्य प्रशासन)जालना वैशाली रसाळ यांनी भेटी देवुन लसीकरण आढावा घेवुन सुचना दिल्या .यावेळी किनगाव लसीकरण केंद्राला आरोग्य सेविका एस.बी.मदने,आरोग्य समुह सहायिका डाॅ.रोहीणी घोगरे,ग्रामसेवक एस.एकुंडे, प्रियका भद्रे,आशास्वंयसेविका नंदा काळवणे,ए.जे.माळवदकर ,मुख्यध्यापक दत्तात्रय गिरी,शिक्षक दत्ता धुमाळ,पी.ए.जाधव,हनुमंत गिरी,शेटे सर,अंगणवाडी सेविका लता पुंगळे,पुष्पा वाघ यांच्या सह ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.