बद्रीनारायण बारवाले यांनी उभारलेल्या गणपती नेत्रालयामुळे जालन्याची सर्वदूर ओळख--- महाराष्ट्राचे महा महीम राज्यपाल सी विद्यासागर राव. जालना-जालना जिल्ह्याची ओळख बि बियाने व स्टीलच्या इंडस्ट्रीज मुळे होती परंतू आता जालना जिल्ह्याची ओळख गणपती नेत्रालया मुळे सर्वत्र होत आहे डाॅ बारवाले हे स्वतंत्र सेनापती होते त्यांनी निजाम राजवटी विरूद्ध बंड पुकारले होते तसेच त्यांनी महिको सिडस कंपनी उभारून महाराष्ट्रातील शेतकरयांसाठी मोठे कार्य केले होते तसेच या सोबतच शेतकरी कष्टकरी लोकांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी शैक्षणीक संस्था उभारल्या तसेच गोर गरिबांच्या आरोग्याची काळजी घेत जालना जिल्हयात उच्च दर्जाचे गणपती नावाचे नेत्रालय उभारल म्हणून अश्या महान कार्य करणारया व्यक्तीची स्मरण ठेवण्याची गरज आहे असे महत्वपूर्ण मार्गदर्शन महामहिम राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी गणपती नेत्रालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने गणपती नेत्र रुग्णालयात आयोजित करण्यात आलेेल्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलताना केले त्यांनी आपले संपूर्ण मार्गदर्शन इंग्रजी भाषेतच केले. श्री गणपती नेत्रालय जालन्याच्या रौप्य महोत्सवी वर्षपुर्ती निमित्ताने झालेल्या मुख्य कार्यक्रमास महाराष्ट्राचे राज्यपाल श्री सी विद्यासागर राव हे मुख्य अतिथी आणी माननीय श्री हरीभाऊ बागडे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य विधानसभा तसेच जालना जिल्ह्याचे पालकमंत्री श्री बबनराव लोणीकर जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार तथा भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री राव साहेब दानवे जालना शहराच्या नगराध्यक्षा सौ.संगीता गोरंट्याल यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री गणपती नेत्रालय जालन्याचे चेअरमन श्री राजेंद्र बारवाले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना असे सांगितले की जालना व जालना लगत भागातील लोकांना अती उत्तम दर्जाची नेत्रसेवा मिळावी यासाठी दिनांक 31 दिसेंबर1992 रोजी पद्मभुषण श्री बद्रीनारायण बारवाले यांनी एक छोटेसे रोपटे लावले होते यासाठी महिको रिसर्च फाऊंडेशनचे विश्वस्त श्री एस एस बद्रीनाथ श्री राम किशन जी मुंदळा डाॅ उषा बारवाले जेर डाॅ भास्कर डाॅ दिपक गर्ग व डाॅ प्रमोद भेंडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले श्री बद्रीनारायण बारवाले यांच्या या छोट्याशा रोपट्याचे मोठ्या झाडात रुपांतर करण्यासाठी श्री गणपती नेत्रालय प्रशासन कार्यरत सर्वांच्या प्रयत्नातून आज संपुर्ण महाराष्ट्रामध्ये अद्यावत तंत्रज्ञानाने सुसज्ज असे धर्मदाय रुग्णालय जिथे आतापर्यंत 1.98000 इतक्या मोठ्या प्रमाणात शस्त्रक्रिया कोणत्याही अडचणी शिवाय पुर्ण केल्या आहेत याचे एक प्रयतन म्हणून चार गावे निवारणीय अंधत्व मुक्त गाव म्हणून घोषित करण्यात श्री गणपती नेत्रालयास यश आले आहे रुग्णालयातील सोई सुविधा बद्दल माहिती देताना असे सांगितले की जालन्यामधील शस्त्रक्रिया विभाग अतिउच्च दर्जाच्या तंत्रज्ञानाचा वापर करून बनवलेला आहे रुग्णालयात डोळ्यांच्या प्रत्येक लहान भागासाठी एक विभाग कार्यरत आहे या सर्व विभागामध्ये रुग्ण्सेवा पुरवण्यासाठी उच्च शिक्षित व अनुभवी कर्मचारी वर्ग कार्यरत आहे श्री गणपती नेत्रालयाचे वैद्यकीय संचालक डाॅ ऋषीकेश नायगावकर यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले व श्री गणपती नेत्रालय जालना या पुढेही माफक दरामध्ये अतिउच्च दर्जाची सेवा पुरवण्यासाठी कटीबद्ध आहे याचा पुनरुच्चार केला यावेळी श्री बद्रीनारायण बारवाले यांच्या जिवन कार्यावर आधारित पुस्तकाचे प्रमुख पाहुण्यांचे हस्ते विमोचनही करण्यात आले यावेळी जालन्याचे खासदार भाजपाचे प्रदेशाध्यक्ष श्री राव साहेब दानवे विधानसभेचे अध्यक्ष श्री हरीभाऊ बांगडे पालकमंत्री श्री बबनराव लोणीकर नगराध्यक्षा सौ संगीता गोरंट्याल यांची प्रमुख उपस्थिती खासदार दानवे विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बांगडे पालकमंत्री श्री बबनराव लोणीकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले शेवटी आभार डाॅ ऋषीकेश नायगावकर यांनी मानलेश