भाजपा प्रदेश अध्यक्ष खा. रावसाहेब दानवे पा. यांचा मुस्लीम समाजाच्यावतीने सत्कार जालना/प्रतिनीधी - जिल्हास्तरिय अल्पसंख्यांक कल्याण समितिवर सदस्य म्हणून शेख ईमाम यांच्या नियुक्तीकरीता शिफारस करुन, समाजाकरीता झटणार्‍या योग्य व्यक्तीची नियुक्ती करुन आणल्याबद्दल भाजपाचे प्रदेश अध्यक्ष खा. रावसाहेब पा. दानवे यांचा मुस्लीम समाजाच्या वतीने नुकताच त्यांच्या निवासस्थानी सत्कार करून आभार व्यक्त करण्यात आले. समाजाच्या वतीने प्रा. मो. इफ्तेखार, मसूद भाई कुरैशी, हाजी हामिद भाई, नाबिल सर, जमील सर, शेख इस्हाक व शेख हकिम यांनी त्यांचे आभार व्यक्त केले. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे पा., बद्री भाऊ पाठड़े, धन्नु भैया़ काबलिये,रवि सेठ अग्रवाल, चन्द्रशेखर मोहरीर, अनिरुद्ध शेळके पा., अमरदीप शिंदे, पारस नन्द, सोमेश भाई क़ाबलिये व नवनिर्वाचीत सदस्य शेख ईमाम यांची उपस्थिती होती.