विभागीय माहिती कार्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ध्वजवंदन औरंगाबाद, :- मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या विभागीय माहिती कार्यालयात प्र.संचालक यशवंत भंडारे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.त्यानंतर सर्वांनी राष्ट्रीय ध्वजास सलामी देऊन राष्ट्रगीत म्हटले. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, माहिती सहायक श्रीमती संजीवनी जाधव-पाटील, श्याम टरके, आदींसह संचालक कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय, माहिती केंद्रातील कर्मचारी उपस्थित होते.