मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदन औरंगाबाद,– मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त दि. 17 सप्टेंबर सोमवार रोजी सकाळी 9 वा. औरंगाबाद महानगरपालिकेच्या सिध्दार्थ उद्यानातील स्मृतीस्तंभाजवळ ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ आयोजित करण्यात आला आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजवंदन होणार आहे.