राज्यपाल चे. विद्यासागरराव यांचा जालना जिल्हा दौरा जालना, – महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल चे. विद्यासागरराव हे जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असुन त्यांच्या दौऱ्याचा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील. सोमवार दि. 17 सप्टेंबर, 2018 रोजी सकाळी 9-30 वाजता औरंगाबाद विमानतळ येथून खाजगी हेलिकॉप्टरने पोलीस परेड ग्राऊंड, जालना येथील हेलिपॅडकडे प्रयाण. सकाळी 9.50 वाजता पोलीस परेड ग्राऊंड हेलिपॅड येथे आगमन व राखीव. सकाळी 9.55 वाजता पोलीस परेड ग्राऊंड हेलिपॅड येथून मोटारीने शासकीय विश्रामगृह, जालनाकडे प्रयाण. सकाळी 10.00 वाजता शासकीय विश्रामगृह, जालना येथे आगमन. सकाळी 10.00 ते 10.15 राखीव. सकाळी 10.15 ते 11.00 शासकीय विश्रामगृह, जालना येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम चळवळीमधील स्वातंत्र्यसैनिक यांच्यासोबत संवाद. सकाळी 11.00 वाजता शासकीय विश्रामगृह सर्वे नं. 488 येथून गणपती नेत्रालय, देऊळगाव राजा रोडकडे प्रयाण. सकाळी 11.15 वाजता गणपती नेत्रालय येथे आगमन. सकाळी 11.15 ते दुपारी 12.00 वाजेपर्यंत श्री गणपती नेत्रालय, जालना येथील रौप्य महोत्सव कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 12.00 वाजता गणपती नेत्रालय, जालना येथून शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. दुपारी 12.15 वाजता शासकीय विश्रामगृह, सर्वे क्र. 488 येथे आगमन व दुपारी 12.15 ते 1.30 वाजेपर्यंत राखीव. दुपारी 1.30 वाजता शासकीय विश्रामगृह, सर्वे क्र. 488 जालना येथून पोलीस परेड ग्राऊंड हेलिपॅडकडे प्रयाण. दुपारी 1.35 वाजता पोलीस परेड ग्राऊंड हेलिपॅड येथे आगमन व राखीव. दुपारी 1.40 वाजता पोलीस परेड ग्राऊंड येथून जवखेडा ता. भोकरदनकडे प्रयाण. दुपारी 2.00 वाजता जवखेडा ता. भोकरदन येथील हेलिपॅड येथे आगमन व मोटारीने जलयुक्त शिवार अभियान कामांच्या भेटीसाठी प्रयाण. दुपारी 2.10 ते 2.40 पर्यंत जवखेडा ता. भोकरदन येथील जलयुक्त शिवार अभियानाच्या कामाच्या पाहणीसाठी राखीव. दुपारी 2.40 वाजता जवखेडा ता. भोकरदन हेलिपॅडकडे प्रयाण. दुपारी 14.50 जवखेडा ता. भोकरदन येथील हेलिपॅड येथे आगमन व राखीव. दुपारी 2.55 वाजता जवखेडा ता. भोकरदन येथील हेलिपॅडवरुन हेलिकॉप्टरने औरंगाबाद विमानतळाकडे प्रयाण करतील.