रस्ते विकासकामांना अधिक गती द्या- नितीन गडकरी औरंगाबाद, – राज्यातील विविध रस्त्यांची असलेली विकासकामे प्राधान्याने अधिक गतीने पूर्ण करावीत, अशा सूचना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग, जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी अधिकाऱ्यांना केल्या. विभागीय आयुक्त कार्यालयात विविध रस्ते विकासकामांचा आढावा श्री. गडकरी यांनी घेतला. यावेळी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अतुल सावे, मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष भागवत कराड, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे चंद्रशेखर, औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी व मराठवाड्यातील महसूल, रस्ते व इतर विभागाचे सर्व वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. श्री. गडकरी यांनी मराठवाड्यासह राज्यातील विविध रस्त्यांच्या विकास कामांबाबत आढावा घेताना भूसंपादन, उर्वरीत राहिलेली कामे लवकर पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या. श्री.चंद्रशेखर यांनी प्राधिकरणामार्फत करण्यात येत असलेल्या विकासकामांची स्थिती व कार्यवाहीबाबत यावेळी सांगितले. त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळ यांनीही रस्त्यांच्या कामांच्या स्थितीबाबत माहिती दिली. सुरूवातीला डॉ. भापकर यांनी श्री. गडकरी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत.