सावळदबारा प्रतिनिधी सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथील जय कालिका देवी शिक्षण संस्था संचलित शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालया मध्ये मुख्यमंत्री चषक 2018 अंतर्गत विविध स्पर्धा घेण्यात आले.100 मीटर धावणे चित्रकाल स्पर्धा आयोजित करण्यात आले होते स्पर्धा मध्ये शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालय सावळदबारा.जय भवानी माध्यमिक व उच्च माध्यमिक मोलखेडा.संत सेवालाल महाराज माध्यमिक विद्यालय देव्हारी.कै लक्ष्मणराव कोलते पाटील महाविद्यालय सावळदबारा तसेच विद्यार्थी.विद्यार्थीनी 100 मीटर धावणे.चित्रकाल स्पर्धांत मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता .यावेळी सुरेश बनकर.इद्रीस मुलतानी.शिवाजी बुढाळ.जयप्रकाश चव्हाण उपस्थिती होती तसेच प्राचार्य एन आर कोलते.व्ही.के.जाधव.बी.वाय.खमाट.व्ही.एस.राजपूत. पी.डी.वैराळकर.बी.बी.ससाणे.जिवन कोलते.आजबराव चव्हाण. शाम जाधव.एम.एम राऊत.शिवाजी सत्रे.आदी शिक्षक कर्मचारी व सावळदबारा परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते