जटवाडा जैन मंदिराचा वार्षिक यात्रा महोत्सवाची जय्यत तयारी १ जानेवारीला होणार ध्वजारोहणाने यात्रेस प्रारंभ औरंगाबाद प्रतिनिधी - लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेले श्री.१००८ संकटहर पाश्श्र्वनाथ दिगंबर जैन अतिशय क्षेत्र जैनगिरी जटवाडा येथे दिनांक १ जानेवारी २०१९ रोजी वार्षिक यात्रा महोत्सवाचे सालाबादाप्रमाणे आयोजन करण्यात आले असल्याचे क्षेत्राचे अध्यक्ष माणिकचंद गंगवाल,महामंत्री देवेंद्र काला यांनी कळविले आहे. सर्व प्रथम दिनांक ०१ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता संतोष,सुमित,सागर कासलीवाल परिवार यांच्या हस्ते ध्वजारोहन करâन कार्यकमाची सुरâवात होईल. तदनंतर ११ वाजता अभिषेक,बोलीया,दुपारी १२ वाजता संकटहर पाश्श्र्वनाथ भगवंताचा पंचामृत अभिषेक होईल यावेळी उपस्थित भाविकांना जैन रॉकर्स गु्रप तर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. पंचरंगी पत्रिकेसाठी दिगंबर क्षिरसागर यांचे सहकार्य मिळाले आहे. तसेच संकटहर पाश्श्र्वनाथ भगवंताचा २७९५ व्या जन्मकल्याणक दिवसानिमीत्त २७९५ दिपकांनी भगवंताची महाआरती संपन्न होणार आहे. दुपारी ४ वाजता सर्वसाधारण सभा संपन्न होणार आहे. संपुर्ण कार्यकमासाठी कुबेर चौगुले हे संगीतकार लाभलेले आहेत. तसेच संध्याकाळी ७ वाजता आरती,शास्त्रवाचन होणार आहे. तसेच क्षेत्रावर वार्षिक यात्रेचे औचित्य साधुन मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. क्षेत्रावर प्रति रविवार,पौर्णीमा,अमावस्या या दिवशी सकाळी १० वाजता भगवंताचा पंचामृत अभिषेक करण्यात येत असतो. प्रत्येक अमावस्याला महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत असते. तरी भाविकांनी या महोत्सवाला उपस्थित राहुन धर्मलाभ घ्यावा असे आवाहन विश्श्वस्थ मंडळ,यात्रा महोत्सव समिती च्या वतीने क्षेत्राचे अध्यक्ष माणिकचंद गंगवाल,महामंत्री देवेद्र काला,कोषाध्यक्ष प्रकाश कासलीवाल,महावीर साहुजी व जयचंद ठोले यांनी केले असल्याची माहिती क्षेत्राचे प्रचार प्रसार संयोजक नरेंद्र अजमेरा व पियुष कासलीवाल यांनी दिली आहे.