जायकवाडी धरणातून लवकरच लोणीसावंगी बंधाऱ्यात पाणी सोडणार....बबनराव लोणीकर... जालना, – लोणी सावंगी, गोळेगाव, लांडकधरा , कुंभार वाडी, चांगतपुरी,संकनपुरी ,सावरगाव, कोकाटे हदगाव, नाथरा, सादोळा, काळेगाव डुबा, पुरुषोत्तमपुरी नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. जायकवाडीतून लोणीसावंगी बंधाऱ्यात सोडण्यासाठी जलसंपदामंत्री नामदार गिरीश महाजन यांचेशी भ्रमणध्वनीवरून सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार बबनराव लोणीकर यांनी दिली. सध्या दुष्काळसदृश्य परिस्थिती असल्याने शेतकऱ्यासमोर मोठे संकट उभे राहिले असून शेतकऱ्यांच्या जनावरांना तसेच पिण्याचा पिण्याचे पाणी मिळावे यासाठी जालन्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांना अण्णासाहेब ढवळे, दादाभाऊ तौर, गोळेगाव प्रकाश टेकाळे राम टेकाळे सुदामराव प्रधान जि.प सदस्य, अर्जुनराव राठोड प.स. सदस्य, प्रदीप ढवळे उपसभापती, अशोकराव वाकणकर नानाभाऊ वाकणकर रामदास सोळंके, राजाभाऊ तौर गंगाधर सुपेकर, रामराव तौर, उद्धवराव तौर, प्रसाद प्रभाकर टेलर, बाळासाहेब यादव, गजानन यादव, राजाभाऊ ढवळे, भगवानराव ढवळे, गंगाधर ढवळे, आदींनी शेतकऱ्यासाठी साठी पैठण डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याबाबत मुद्दा उपस्थित करून तात्काळ गोदावरी पात्रातील बंधाऱ्यामध्ये पाणी सोडण्याबाबत विनंती केली होती. लोणी सावंगी, गोळेगाव, लांडकधरा , कुंभार वाडी, चांगतपुरी,संकनपुरी ,सावरगाव, कोकाटे हदगाव, नाथरा, सादोळा, काळेगाव डुबा, पुरुषोत्तमपुरी इत्यादी गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरी गोदावरीच्या पात्रामध्ये आहेत बंधाऱ्याच्या 15 किलोमीटर कार्यक्षेत्रात परतुर, माजलगाव, व पाथरी या तीन तालुक्यातील पिण्याच्या पाण्याच्या विहिरी पात्रात आहेत जनावरांना पिण्यासाठी पाणी नाही या सर्व गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार आहे. पशुपक्षी यांना लागणार पाणी समस्या निर्माण झाली आहे. पैठण पासून नांदेड पर्यंत गोदावरीच्या पात्रात सर्व बंधाऱ्यात पाणी सोडण्यात आले आहे. या बंधाऱ्यात पाणी सोडण्याची मागणी गावकरी शेतकरी यांनी आज पाणी पुरवठा स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडे केली आहे बबनराव लोणीकर यांनी लागलीच राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्याशी चर्चा करून पैठण डाव्या कालव्यातून तातडीने पाणी सोडण्याची मागणी केली,तसेच दूरध्वनीवरून जलसंपदा विभागाचे सचिव,कार्यकारी संचालक अजय कोहिनकर, अधीक्षक अभियंता संजय भरगोदेव कार्यकारी अभियंता यांना तात्काळ पाणी सोडण्याबाबत निर्देश दिले आहे. जायकवाडी धरणात सध्या पुरेसा पाणीसाठा आहे. धरणातून लोणीसावंगी बंधाऱ्यात पाणी येणार असल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला असून पालकमंत्री बबनराव लोणीकर यांचे आभार मानले आहे.