भिडेला जालन्यात पाय ठेऊ देणार नाही - दिपक डोके भिडेवर काय कारवाई केली; भारिपचे जवाब दो आंदोलन जालना (प्रतिनिधी)ः जालना जिल्ह्यात संभाजी भिडे जालन्यात येणार असल्याने जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे प्रशासनाने त्यांच्या सभेस परवानगी नाकारावी अन्यथा भारिप भिडेला जालन्यात पाय ठेऊ देणार नाही. असा इशारा भारिपचे जिल्हाध्यक्ष दिपक डोके यांनी दिला आहे. जिल्हाधिकारी कार्यायलासमोर जवाब दो आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात हा इशारा देण्यात आला आहे. 1 जानेवारी 2018 रोजी भिमा कोरेगाव येथे आंबेडकरी अनुयायांवर भिडेच्या सांगण्यावरुन समाज कंटकांनी दगडफेक करुन भ्याड हल्ला केला होता. त्यानंतर संभाजी भिडे यांच्या प्रक्षोभक भाषणबाजीमुळे वडू गावातील लोकांनी आंबेडकरी अनुयायांसोबत भेदभावाचा व्यवहार केला व राज्यभरात दंगली भडकावल्या होत्या. या प्रकरणी भिडेवर प्रशासनाने काय कारवाई केली याचा खुलासा भारिपच्या वतीने विचारला जात असुन जालना जिल्ह्यातही सर्व तहसिल कार्यालयासमोर जवाब दो आंदोलन करण्यात आले. तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनादरम्यान महिलांनी भिडेच्या फोटोला चपलाने मारहाण करीत निषेध नोंदवीला. यावेळी जिल्हाध्यक्ष दिपक डोके, प्रा. डॉ. प्रविण कनकुटे, विष्णू खरात, दिपक घोरपडे, अ‍ॅड. कैलास रत्नपारखे, विनोद दांडगे, तालुकाध्यक्ष राजेंद्र खरात, बबन जाधव, परमेश्वर खरात, शफीक आतार, अ‍ॅड. गोविंद रत्नपारखे, गौतम वाघमारे, के.सी. साळवे, शिवाजी दाभाडे, निर्वाण खरात, आनंद म्हस्के, महिला जिल्हाध्यक्षा मंदाताई निसर्गन, जिल्हा महासचिव रमाताई होर्सीळ, मिनाताई वाहुळे, बाळासाहेब रत्नपारखे संतोष आढाव, शिवदास म्हस्के, राहुल खरात, वैभव वानखेडे, कपील डोके, प्रसाद सदावर्ते, विकास तुरेराव, कैलास रत्नपारखे, दिपक रत्नपारखे, खाजा खान, गौतम भालमोडे, आनंद म्हस्के, राहुल भालेराव, सुभाष साबळे, सचिन पटेकर, भास्कर उघडे, सुरज सोनवने, प्रविण खरात, नितीन बाळराज, गणेश शिंदे, गौतम गंगातिवरे, लाला बाळराज, सिध्दार्थ गवई, राहुल सदावर्ते, विलास नरवडे, सुरमासिंग जुन्नी, विनोद भालेराव, रतन दाहीजे, सतिष साळवे, बाबासाहेब दाहीजे, प्रदिप जोगदंडे, रोहण वाघमारे, गणेश खरात, देवीदास कोळी, संतोष शेळके, प्रा. सिध्दार्थ पैठणे यांची उपस्थीती होती. निदर्शनानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. भिडेला अटक का करण्यात आली नाही, भिमा कोरेगाव प्रकरणी जिल्ह्यात दिपक डोके आणि इतरावर दाखल करण्यात आलेले गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत, भिमा कोरेगाव प्रकरणी व्हिडीओ क्लिप व्हायरल केल्याच्या आरोपाखाली जिवन दांडगे यांच्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा तात्काळ मागे घेण्यात यावा,सत्तेपुर्वी मुस्लीमांना आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते, ते आश्वासन पुर्ण का केले नाही, धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा प्रलंबीत का ठेवला, जालना जि ल्ह्यात दुष्काळी परिस्तीती असतांना अजुनही चारा छावण्या तसेच इतर उपाय योजना करण्यात आल्या नाहीत. त्या तात्काळ करण्यात याव्यात अदि मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत.