शिवसेना शाखेच्या माध्यमातून चांगले काम करुन सर्वसामान्य व दबलेल्या माणसाचा आवाज व्हा - जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर जालना, (प्रतिनिधी)-ज्या तरुणांनी एकत्र येवून शाखेची स्थापना केली. या शाखेच्या माध्यमातून तरुणांचे मजबुत संघटन करुन सामान्य नागरिकांचे अनेक प्रश्न सोडविण्यासाठी व त्यांना न्याय मिळून देण्यासाठी सर्वांनी काम करावे, असे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी केले आहे. जालना शहर व जिल्ह्यात शिवसेनेच्या वतीने नवनवीन शाखांचा शुभारंभ करण्यात येत असून मंठा चौपुâली येथील प्रभाग क्र. ३ मध्ये शिवसेनेच्या शाखेच्या शुभारंभ जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपजिल्हाप्रमुख पंडीत भुतेकर, रावसाहेब राऊत, शहरप्रमुख विष्णु पाचपुâले, आत्मानंद भक्त, पंचायत समितीचे सभापती पांडूरंग डोंगरे, रतनकुमार नाईक, संतोष जांगडे, बंकट राठोड, नंदुसंघ नेनावत, प्रकाश चव्हाण, डॉ. राम चव्हाण, यु.एल. पवार, डॉ. एस.एम. राठोड, विजय चव्हाण, रामलिंग मानकरी, विठ्ठल राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलतांना भास्कर अंबेकर म्हणाले की, आज अनेक तरुण राजकारणात सहभागी होत आहेत. पण चुकीच्या माणसाचे व पक्षाचे नेतृत्व स्विकारल्याने त्यांचे भवित्व अंधःकारमय झाले आहे. तरुण वयामध्ये बहुबली व गुंडगर्दी करणाNयांचे आकर्षण व अशा वेळी चुकीच्या नेतृत्वामध्ये गेल्याने आपल्या तरुण्यांचा व शक्ती फायदा अनेक लोकांनी आपल्या स्वार्थासाठी करुन घेतला आहे. तेच जर आपण चांगल्या नेतृत्व व पक्षांच्या मागे गेल्यास त्यामुळे आपल्यासह आपल्या परिसराचा व समाजाचा विकास मदत मिळेल. अशा नेतृत्वामुळे आपल्या भागातील रस्ते, नाल्या, विविध लागणारे प्रमाणपत्रे, शाळांचे प्रवेश यांसारख्या अनेक समस्या सामान्यांना भेडसवतात. त्या सोडविण्यास मदत होईल. या कार्यातून आत्मीक समाधान मिळून तुमचीही शक्ती लोकोपयोगी होईल. आज अनेक तरुण चौका-चौकात बसून वाढदिवस साजरे करणे, अनेक भ्रष्ट नेते त्यांच्या पाठीमागे तुम्ही फिरु नका, ते फक्त तुमच्या शक्तीचा वापर करुन घेतात. त्यामुळे वेळीच सावध व्हा, व समाजाचे दिशाभुल करणारे बहुबली व भ्रष्ट नेते यांना समाजासमोर उघडे पाडा, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तुमच्या आमच्या सारख्या फाटक्यांना शक्ती दिली. व सर्वांना एकत्रित करुन मोठमोठ्या पुढाNयांना गुंडांना घरी बसविण्यास भाग पाडले. ही इतकी मोठी शक्ती संघटनेमध्ये असल्याचे ते म्हणाले. आजकाल सोशल मिडियामध्ये तरुण गुंरफटून गेला असून या समाज माध्यमांचा वापर विधायक कामासाठी करण्याऐवजी विघातक कामांसाठी केला जात असल्याचे ते म्हणाले. शिवाजी महाराजांचे आदर्श सांगणारे आपण वाढदिवसांचे तलवारीने केक कापून त्यांचा अवमान करु नये, असेही ते म्हणाले. यावेळी उपजिल्हाप्रमुख पंडीत भुतेकर यांनी तरुणांना शाखेच्या माध्यमातून आपल्या प्रभागात फिरुन लोकांचे प्रश्न समजून घ्या व ते सोडविण्यासाठी प्रयत्न करा, अडअडचणीच्या प्रसंगी आम्ही तुमच्या पाठीशी ठाम उभे असल्याचे ते म्हणाले. याच कार्यक्रमात बोलतांना शहरप्रमुख विष्णु पाचपुâले म्हणाले की, जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर हे नगराध्यक्ष असतांना त्यांनी या शहरासाठी पाणीपुरवठ्याची महत्वकांक्षी योजना आणली. त्याच बरोबर अनेक विकास कामे त्यांच्या कार्यकाळात उभी राहील. परंतु त्याचे श्रेय घेण्यासाठी त्यांनी कधीही साधे होर्डींगही लावले नाही. त्यांनी आपल्या राजकीय जिवनात अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करुन शहराला पर्यायी रस्ते, संभाजी उद्यानाचा विकास, नदीवरील पुले यासह त्यांच्या कार्यकाळात घाणेवाडी जलाशय पुर्णपणे कोरडा पडला असतांनाही केवळ शहागड-जालना पाणी पुरवठा योजनेवरुन दोन दिवस आड शहराला पाणी दिले. अशा कर्तबगार व्यक्तीच्या नेतृत्वात आम्ही काम करत असल्याने आम्हाला त्याचा अभिमान वाटतो, असेही ते म्हणाले. यावेळी बोलतांना उपजिल्हाप्रमुख रावसाहेब राऊत म्हणाले की, आम्ही आमच्या तरुण्यांत शिवसेने सारखे चांगल्या संघटनेत सहभागी होवून कुणालाही न घाबरता, काम करत गेल्यानेच मोठ्या पदावर पोहोचलो. शिवसेनेत सर्वांना संधी मिळते, फक्त प्रामाणिकपणे काम करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. किशोर शिंदे, प्रकाश घोडे, शाखाप्रमुख आयुष राठोड, अमोल राठोड, कृष्णा मिसाळ, विकास जैवाळ, करण पवार, सिध्दार्थ हिवाळे,सचिन चव्हाण, सचिन राठोड, अनंता खर्डेकर, इरफान शेख, भागवत देशमुख, श्याम वांगे, अर्जुन घारे, डिंगाबर शेळके, सुजित चौधरी, भुषण चौधरी, नितीन गवळी, गणेश वाघ, आकाश देशमुख, अनिल हिवाळे, इम्रानशेख, राजु राठोड, सिध्दार्थ मगर,हिमांशु झोटे, आकाश म्हस्के, गजानन गोरे, गणेश बळप, स्वप्नील गोरे, समीर बागवान, मोहित वाकोडे, तन्मय टोन्पे, विशाल सदावर्ते, ओमकार राठोड, अनिकेत गायकवाड, वरद साखळकर, प्रणव वनाल, अभिषेक माने, रविंद्र पवार यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकत्र्यांची उपस्थिती होती.