दिनदर्शिका २०१९चे विमोचन सोहळा संपन्न जालना : ब्राह्मण वधु-वर संचालक मंडळ, जालना शाखेच्या वतीने आज ३१डिसेंबर रोजी २०१९ च्या दिनदर्शिकेचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी भाजप जालना शहराध्यक्ष सिद्धीविनायक मुळे, दिपक रणनवरे, अनंत वाघमारे, संजय देशपांडे, दीपा बिन्नीवाले,संगिता देशपांडे,अपर्णा राजे,संध्या कुलकर्णी यांच्यासह अनेक समाजबांधव उपस्थित होते. यावेळी मुळे म्हणाले, या दिनदर्शिके मुळे संपुर्ण हाराष्ट्रातील उपवर शोधण्यास मदत होईल. या माध्यमातुन अनेक विवाह जुळावे असे ते म्हणाले. या वेळी दीपक रणनवरे,संगिता देशपांडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.