माजीमंत्री आमदार अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हास्तरीय कराटे स्पर्धा संपन्न औरंगाबाद : औरंगाबाद शहर युवक काँग्रेसच्या वतीने आज दिनांक ३१ डिसेंबर २०१८ रोजी माजीमंत्री तथा औरंगाबाद काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष आ. अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त नेहरु भवन औरंगाबाद येथे जिल्हास्तरीय कराटे स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन औरंगाबाद शहर युवक काँग्रेसचे महासचिव इंजि. मोहसिन खान व ड्रॅगन शॉलिन कुंगफु स्कुल ऑफ मार्शल आर्टस इंटरनॅशनल चे मास्टर सुल्तान शेख यांनी केले होते. कराटे स्पर्धेमध्ये मराठवाड्यातील विविध तालुक्यातील व शहरातील विविध वयोगटातील एवूâण १५० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये कराटेच्या खेळाडूंनी विविध प्रात्याक्षिक करुन दाखविले व त्यानंतर स्पर्धेला सुरुवात झाली या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंना ट्रॉफी व कॅश बक्षिसे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन ऍड. रमेश जोगदंड यांच्या हस्ते करण्यात आले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.आ. कल्याण काळे हे होते. यावेळी सय्यद शाहरुख मुजाहेद, गौरव जैस्वाल, सरताज खान, सुल्तान सर, इंजि. मोहसिन खान, शोएब अब्दुल्ला, टिपू सुल्तान फोर्सचे पदाधिकारी व औरंगाबाद शहर जिल्हा युवक काँग्रेसचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते