धर्मवीर संभाजी प्राथमिक विद्यालयात ’६२ वा महापरिनिर्वाणदिन’ दि.६ डिसेंबर रोजी संपन्न झाला. या प्रसंगी बोलताना, कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या श्रीमती लहाने मॅडम यांनी डॉ.आंबेडकरांना लागलेल्या पुस्तक वेडाची’ कथा तसेच भगवान गौतम बुध्दांच्या विचारांचा पगडा सांगणारी कथा गोष्टीरूपाने सांगितल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षा, श्रीमती स्मिता खोतकर यांनी आंबेडकरांच्या सामाजिक संघर्ष व त्यामागील उद्द्शेच तसेच पुस्तकवेड व ग्रंथालयातील पुस्तकवाचनासाठी या निमित्ताने १ तासाचे नियोजन केले. इ.४थी मराठी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या डॉ.आंबेडकरांच्या जीवनाची माहिती देणा-या भित्तीपत्रचे विमोचन प्रमुख पाहुण्यांच्या व अध्यक्षांच्या हस्ते करण्यात आले.विदयार्थ्यांन्वे डॉ.आंबेडकरांचे जीवनपट सांगणारी भाषणे केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन इ.४थी मराठी ची विद्यार्थींनी इशीता सोनवणे केले. कार्यक्रमाची सांगता इ.४थी मराठी च्या विद्यार्थ्यांनी ’ चवदार तळ्याचे पाणी’ या गीताने ली.मुख्याध्यापिका श्रीमती स्मिता खोतकर व सर्व शिक्षकांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.या कार्यक्रमास, मुख्याध्यापिका श्रीमती स्मिता खोतकर,वर्ग शिक्षिका श्रीमती लहाने मॅडम व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.