औरंगाबाद महानगरपालिकेचा 36 वा वर्धापन दिन साजरा औरंगाबाद महानगरपालिकेचा 36 वा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे.यानिमित्त आज दि 7 डिसें रोजी सिद्धार्थ उद्यान येथे मनपा चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांच्या साठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या आरोग्य शिबिराचे उदघाटन मा महापौर श्री नंदकुमार घोडेले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मा स्थायीसमिती सभापती श्री रेणुकादास वैद्य, मा सभागृह नेता श्री विकास जैन ,मा अतिरिक्त आयुक्त श्री श्रीकृष्ण भालसिंग ,मनपा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ नीता पा डळकर, मा जनसंपर्क तथा सांस्कृतिक अधिकारी श्री संजीव सोनार उद्यान अधिकारी विजय पाटील क्रिडा अधिकारी श्री संजीव प्रसाद बालय्या, तसेच अधिकारी,कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती . यावेळी मा महापौर म्हणाले की ,दरवर्षी मनपा तर्फे जवळपास 800 ते 1000 चतुर्थश्रेणी कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करण्यात येते . या वर्षी पासून काही असाध्य रोगावरती इलाज तथा ऑपरेशन करण्यासाठी चा खर्च मनपा तर्फे करण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला आहे. स पदाधिकारी,स नगरसेवक, अधिकारी,कर्मचारी हे एक मनपाचे कुटुंब असल्यामुळे या प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. यावेळीं कर्मचाऱ्यांची रक्त तपासणी, एच आय व्ही तपासणी, रक्तगट तपासणी करण्यात आले. यावेळी जवळपास 180 कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच यासोबत मनपाच्या सर्व वार्ड मधील आरोग्यकेंद्रावर्ती कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात येणार आहे.