राष्ट्रीय स्तरावर शेतकNयांसाठी वैद्यकीय सेवा उपलब्ध करा– अनिस पटेल यांची राष्ट्रीय अध्यक्षाकडे मागणी औरंगाबाद : किसान व खेत मजुर काँग्र्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार नाना पटोले हे औरंगाबाद येथे पक्षीय कार्यक्रमासाठी आले होते त्यावेळेस त्यांना किसान व खेत मजुर काँग्रेसचे प्रदेश सचिव अनिस पटेल यांनी एक सविस्तर निवेदन दिले आणि त्या निवेदनामध्ये मागणी केली की, मराठवाडा महाराष्ट्र तथा राष्ट्रीय स्तरावर दुष्काळाची अत्यंत गंभीर स्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी शेतमजुर हवालदिल झाले आहे नव्हे त्यांचेवर उपासमारीची वेळ आलेली आहे त्यामुळे त्यांच्याकडे आर्थिक कमतरता निर्माण झालेली असल्यामुळे त्यांना त्यांच्या आजारपणासाठी कुठलीही वैद्यकीय सेवा शासनाच्या वतीने उपलब्ध नसल्यामुळे त्यांची सामाजिक आणि आर्थिक स्थिती पाहता त्यांना तात्काळ मोफत वैद्यकीय तपासणी आणि निशुल्क औषधोपचार होवून औषधे मिळण्यासाठी आणि शेत मजुरास आणि शेतकNयास त्यांच्या मालास हमी भाव मिळावा आणि शेतमजुरांना निवृत्ती वेतन लागू करण्यात यावे या व इतर अनेक महत्वपूर्ण मागण्या त्यांनी आपल्या निवेदनामध्ये मा.खा.नानासाहेब पटोले यांना सादर केले असून सदरचे निवेदन देतांना त्यांच्या सोबत महाराष्ट्र प्रदेश किसान व खेतमजदुर काँग्रेसचे अध्यक्ष विश्वास उपासे, कर्नाटक राज्याचे अल्पसंख्याक विभागाचे प्रभारी व मनपा माजी विरोधी पक्षनेता डॉ.जफर खान, प्रदेश सचिव अनिस पटेल, आकेफ रजवी, मोईन इनामदार, हिशाम उस्मानी, शेख युसुफ, मोहसीन खान, संजय जाधव, अकिल काझी, जावेद पटेल, रियाज पटेल, साजेद खान, शेख अखलाक, सागर गायकवाड, शेख अल्ताफ, शेख इस्माईल, मझहर खान या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.