शिवसेनेच्या वतीने आज रत्नपुर तालुक्यात सदस्य अभियान आयोजन शिवसेनेच्या वतीने मोठ्या प्रमाणात सदस्य होण्यासाठी संभाजीनगर जिल्ह्यात सदस्य नोंदणी अभियानाचे आयोजन करण्यात आले असून शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे पालकमंत्री डॉक्टर दीपक सावंत संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली या अभियानाचे आयोजन करण्यात आले असून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात विभाग निहाय सदस्य नोंदणी अभियान आयोजन करण्यात आले आहे संयोजक शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या प्रमुख उपास्थिति त आज १६ सप्टेंबर २०१८ रविवार रोजी सकाळी ९:०० वाजता रत्नपुर तालुक्यातील बाजार सावंगी, वेरूळ ,गदाना ,रत्नपुर शहर या विभागाचे सदस्य नोंदणी अभियान स्थळ: श्री लक्ष विनायक गणेश मंदिर वेरूळ या ठिकाणी होणार आहे या अभियानास उपतालुकाप्रमुख विभाग प्रमुख उपविभागप्रमुख शाखाप्रमुख उपशाखाप्रमुख गटप्रमुख आजी माजी पदाधिकारी लोकप्रतिनिधी शिवसेने यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन उपजिल्हाप्रमुख लक्ष्मण भाऊ सांगळे कृष्णा पाटील डोणगावकर तालुकाप्रमुख राजू वरकड तालुका संघटक गणेश अधाने यांनी केले आहे