बोयनर यांना कार्य गौरव पुरस्कार वैजापूर प्रतिनिधी-येथील पंचायत समितीचे तालुका कृषी अधिकारी हनुमंत बोयनर यांना त्यांच्या योगदानाबद्दल कार्य गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले येथील सेन्ट मोनिका इंग्लिश स्कूलमध्ये डॉ शरदचंद्र साळुंके यांच्या समनार्थ आयोजित 'समर्पण दिन ' कार्यक्रमात तालुक्यात समर्पक भावनेतून काम करणाऱ्या अधिकारी , कर्मचार्यांसह सामाजिक योगदान देणाऱ्या व्यक्तीला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वैजापूर नगर पालिकेच्या अध्यक्षा व सेंट मोनिका शाळेच्या सचिव शिल्पा परदेशी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल गटविकास अधिकारी अजय सिंह पवार, कृषी अधिकारी एस एन मुसणे, गजेंद्र देशमुख, रॉयल धुळे, एम के डिके, गणेश चुकेवाड, दत्ता जाधवर, अमेय पवार, आनंद मगर, भानुदास बागुल, साहेबराव पडवळ, उदयसिंह राजपूत सह कर्मचारी व ग्रामसेवक संघटना पंचायत समिती वैजापूर यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे,.