धर्मवीर संभाजी प्राथमिक विद्यालयात ’श्री गणेश स्थापना’ कार्यक्रम उत्साहात साजरा धर्मवीर संभाजी प्राथमिक विद्यालयात ‘शाडू माती पासून तयार करण्यात आलेल्या श्री गणेश मुर्तीची स्थापना’ संगीतमय वातावरणात करण्यात आली. या प्रसंगी ’शाडू माती’ ही कशी पर्यावरणपूरक आहे याचे महत्व अध्यक्षांनी उपस्थित विद्यार्थ्यांना समजावून सांगीतले. शालेय उपक्रमात विद्यार्थ्यांचा सहभा वाढवाण्यासाठी विशेष कामासाठी उपस्थित विद्यार्थ्यांमधून ’लकी ड्रॉ पद्धतीने’ विद्यार्थ्यांची निवड केली जाते. या वर्षी प्रणव राठोड या विद्यार्थ्यांची निवड केली गेली. या कार्यक्रमात शालेय विद्यार्थी व विद्यार्थीनींनी वैविध्यपुर्ण सजावट, आकर्षक रांगोळी, दिव्यांची रोषणाई करून सक्रिय सहभाग नोंदवला. या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी श्रीमती स्मिता खोतकर मॅडम यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी निर्माल्य संकलन करून खत निर्मितीचा संकल्प केला. सजावट समिती श्रीमती कांबळे नेमाडे व गायकवाड यांनी साभाळली तर सुत्रसंचलन तसेच पुजाविधी श्रीम. देशपांडे यांनी संगितला. आभार प्रदर्शन श्रीमती साबळे यांनी केले. येत्या दहा दिवसात विद्यार्थ्यांची कार्यानुभव कार्यशाळा घेऊन विविध वस्तु तयार करणे विद्यार्थ्य्यांना शिकवण्यात येतील. या कार्यक्रमास मुख्याध्यापिका श्रीमती स्मिता खोतकर तसेच शाळेचे सर्व शिक्षकावृंद यांनी सहकार्य केले.