जनविकास शिक्षण संस्था भोकरदन येथे " हिंदी भाषा दिवस " उत्साहात साजरा भोकरदन शहरातील जनविकास शिक्षण संस्था संचलित श्री गणपती इंग्लिश / मराठी हायस्कूल पायोनियर सीबीएसई स्कूल , स्व. अॅड भाऊसाहेब देशमुख मराठी विद्यालय जोमळा ता.भोकरदन येथे दि.14/ 9/ 18 रोजी " हिंदी भाषा दिवस "उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी हिंदी क्लब ची स्थापना करण्यात आली या अगोदर विविध स्पर्धा चे आयोजन करण्यात आले व यामध्ये विजेता विद्यार्थ्यांना पुरस्कार देण्यात आले आपल्याला प्रास्ताविक अझर.शेख यांनी केले यावेळी ज्योती सोनवणे, जफर मदनी, सौ पगारे, रशिदा शेख, ज्ञानेश्वर मालोदे या शिक्षकांनी व वरद सांगोळे. पल्लवी सहाने. जान्हवी बाहेकर. रोहित जाधव मदन बाहलोद वैभव पांडे आणि प्रांजल इंगळे यांनी हिंदी भाषेचे महत्त्व सांगितले सूत्रसंचालन समरीन शहा या विद्यार्थ्यांने केले या कार्यक्रमास शाळेचे प्राचार्य मुख्याध्यापक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते