वृत्तपत्र व्यवसायात टिकून राहने हे महत्वाचे-- यशवंत भडारे वृत्यपत्रहे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखतो परंतू आजच्या स्पर्धेच्या काळात वृत्तपत्र टेकवून चालवून हे कठीण काम आहे एका छोट्याशा गावात जन्म घेतलेल्या सुग्रीव मुंडे यांनी छानशी नोकरी केली. प्रदेशात जाऊन पैसा कमावला असता परंतू मुंडे यांनी स्व बळावर पत्रकारितेचा विद्या शिकून समाजिक चडवड उभी करण्याचे महत्वपूर्ण कार्य केलेले असून यामुळे ते शुभिच्छेस पात्र आहे.मुंडे साहेबांनी नौकरी एक्सप्रेसच्या माध्यमातून हिंदी व इंग्रजीतून देखील वृत्तपत्र सुरू करावे असे म्हत्वपुर्ण उदगार विभागीय माहिती संचालक श्री यशवंत भंडारे यांनी जालना येथे दैनिक अत्ताच एक्स्प्रेस आणि नौकरी एक्स्प्रेस या वृत्तपत्राच्या जिल्हा कार्यालयाचे उदघाटन प्रसंगी प्रमुख उदघाटक म्हणून व्यक्त केले., या वेळी जिल्हा ग्रंथाधिकारी जालना सचिन हजारे यांची उपस्थिती होती यावेळी प्रमुख पाहुण्यांचे हस्ते जिल्हा कार्यालयाचे थाटात उदघाटन झाले. एम एल कुरेशी जिल्हा प्रतिनिधी जालना यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. आज दि.14 सप्टेंबर रोजी मराठवाड्यातील निर्भीड बातमीपत्र असलेल्या दैनिक अत्ताच एक्स्प्रेस आणि नौकरी एक्स्प्रेस या वृत्तपत्राचे प्रमुख पाहुण्यांचे हस्ते थाटात उदघाटन करण्यात आले. या उदघाटन सोहळ्याचे संयोजक मुख्य संपादक श्री सुग्रीव मुंडे होते. व उदघाटक म्हणून मा. श्री यशवंत भंडारे.विभागीय माहिती संचालक मराठवाडा विभाग औरंगाबाद यांची उपस्थिती लाभली होती तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री सचिन बापूराव हजारे ,मा.श्री राजेंद्रसिंह गौर. पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना. मा.श्री संतोष खांडेकर.मुख्याधिकारी जालना. मा.श्री अशोक कायंदे मुख्याधिकारी सिल्लोड मा.श्री संजोग हिवाळे. धडाडीने जिल्हा वृत्तपत्र विक्रेता गुंजवणी शाह. सुभाष देठे. श्रीमती मंगला यादव परमेश्वर नरवळे व सामाजीक कार्यकर्ते यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी सर्व प्रमुख पाहुण्यांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला मुख्य संपादक श्री सुग्रीव मुंडे सर यांनी या कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले आपल्या प्रस्वताविकात मुंडे यांनी वृत्तपत्र चालविण्यात आज घडीला येत असलेल्या अडचणी व या सर्व अडचनीच्या माध्यमातून मार्गक्रमण करीत वृत्तपत्रा चालविणे कसे कसरतीचे काम ठरत आहे व या कसरतीतून मार्गक्रमण करीत वृत्तपत्र चालविणे कसे अवघड काम बनले आहे. याची तपशीलवार माहिती देताना सांगितले की वृत्तपत्राकडे पाहण्याचा शासनाचा दृष्टीकोन सुद्धा आजच्या घडीला बदलत चाललेला असून. यामुळे नव नवीन वृत्तपत्र चालविणे कठीण बनले आहे वृत्तपत्र हे लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला गेलेला आहे या मुळे लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी वृत्तपत्र टिकने हे फार म्हत्वाचे आहे म्हणून लोकशाही टिकविण्यासाठी वृत्तपत्र ही टिकले पाहिजे असे माझे मत आहे.म्हणून शासनाने देखील या कडे लक्ष देण्याची गरज आहे . यावेळी ग्रंथ अधिकारी सचिन हजारे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले अजय कांबळे यांनी शेवटी सर्वांचे आभार मानले