पर्यावरणपुरक गणपती ही काळाची गरज- जि.प. अध्यक्ष अनिरुध्द खोतकर जालना,(प्रतिनिधी)-जालना शहरातील संभाजीनगर प्रभागातील शांतिनिकेतन विद्या मंदिर शाळेत गणोशोत्सवाच्या निमित्ताने पर्यावरणपुरक गणेश मुर्ती निर्मितीचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांची जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुध्द खोतकर, अपर पोलीस अधिक्षक समाधान पवार, संस्थेचे अध्यक्ष तथा शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी पाहणी करुन विद्याथ्र्यांचे कौतुक केले. यावेळी त्यांच्यासोबत संस्थेचे सचिव बिजु वाघमारे, कडवंचीचे सरपंच चंद्रकांत क्षिरसागर, विष्णु क्षिरसागर यांची प्रमुख्यांनी उपस्थिती होती. यावेळी विद्याथ्र्यांना उद्देशून बोलतांना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुध्द खोतकर म्हणाले की, आता पर्यावरण अत्यंत प्रार्दुषित झालेले असून दिवसेंदिवस पर्यावरणाचा Nहास होत आहे. लहान आठवते की, खेड्या-पाड्यात तसेच जिल्ह्यातील मोेठ्या नद्यांही प्रार्दुषित नव्हत्या. या नद्यांचे पाणी पिण्यासाठीही वापरले जायचे. परंतु आज मात्र परिस्थितीत अत्यंत गंभीर झालेली आहे. सर्व नद्यां-नाल्यांसह पर्यावरणाची प्रचंड हानी झाल्याचे दिसून येते. त्यामुळे पर्यावरणपुरक गणपती ही काळाची गरज बनली असून प्रत्येकांने या उपक्रमाचे अनुकरण करावे, असेही ते म्हणाले. याच कार्यक्रमात बोलतांना अप्पर जिल्हा पोलीस अधिक्षक समाधान पवार म्हणाले की, पर्यावरणाच्या समोर संवर्धनासाठी प्रत्येकाने एक तरी झाड लावणे गरजेचे आहे. याप्रमाणे शहरी व ग्रामीण भागात याप्रमाणे वृक्ष संवर्धन केले तर आज जगासमोर पर्यावरणाच्या प्रादुषणाने निर्माण झालेल्या समस्या थांबविता येतील,आज आपल्या शाळेत राबविण्यात येत असलेला पर्यावरणपुरक गणेश मुर्ती निर्मिती उपक्रम अत्यंत महत्वाचा असून यामुळे आपण जलसाठ्यांचे प्रादुर्षण थांबू शकतो, याप्रमाणे आपणासह आपल्या आजु-बाजूला राहणाNया नागरिकांनीही या उपक्रमासंबंधी जागृत करुन पर्यावरणपुरक गणेश मुर्ती प्रतिष्ठीस्थापना करावी व आपण स्वतः आपल्या हाताने मुर्ती तयार करुन प्रतिष्ठास्थापना केल्यास त्यातून मिळणारा आनंद अत्यंत मोलाचा असल्याचे सांगून त्यांनी या उपक्रमांचे कौतुक केले. यावेळी आपल्या प्रास्ताविकपर भाषणामध्ये जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर म्हणाले की, स्वतः निर्माण केलेली गणेश मुर्तीची प्रतिष्ठीस्थापना आपणास आनंद देणारी आहे. तसेच ही मुर्ती पर्यावरणासाठी पुरक असून यामुळे आपल्या बुध्दी व मनाला चालना मिळते व आत्मीक आनंदही प्राप्त होतो. हा उपक्रम हा पथदर्शी असून यापुढे दरवर्षी प्रत्येकांने याप्रमाणेच पर्यावरणपुरक गणेश मुर्ती निर्माण करुन आपणासह इतरांनाही यासाठी प्रोत्साहीत करुन व पर्यावरणाचे संवर्धन करावे असेही त्यांनी सांगितले. या उपक्रमासाठी मान्यवरांनी उपस्थितीत राहून विद्याथ्र्यांना प्रोत्साहित केल्याबद्दल त्यांनी धन्यवाद दिले. यावेळी शाळेतील मुख्याध्यापक ज्ञानेश्वर गाढवे, आंबादास घायाळ यांच्यासह शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी व पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन पल्लवी खरात यांनी केले.