माणस बनवण्याचा व घडवण्याचे खरे व्यासपीठ म्हणजे दिंडोरी माउलीचे कार्य आहे ”- ना. बबनराव लोणीकर सेलु - -माणस बनवण्याचा व घडवण्याचे खरे व्यासपीठ म्हणजे दिंडोरी माउलीचे कार्य आहे जनकल्याणासाठी अहोरात्र दिंडोरी येथील माउली कार्य म्हणजे चालते बोलते संस्कार विद्यापीठ होय. “श्री स्वामी समर्थ महाराजांना भूषणावह होईल असे वागावे व महाराजांच्या इच्छेत इच्छा मिसळून राहावे” असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. लोणीकर यांनी केले सेलू जि परभणी येथे परम पूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांचे जेष्ठ पुत्र श्री चंद्रकांत दादा मोरे यांचे मार्गदर्शनपर अमृततुल्य हितगुज या कार्यक्रमात उपस्थित जनसमुदायास संबोधित करताना मा.ना.बबनराव लोणीकर बोलत होते यावेळी व्यासपीठावर परमपूज्य चन्द्रकांत दादा मोरे, विनोदराव बोराडे नगराध्यक्ष सेलू, श्रीमती भावनाताई नखाते उपस्थित होते. ना. लोणीकर पुढे म्हणाले जनकल्याणासाठी आमचे सरकार सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, मानवी जीवनात संस्काराचे बीज पेरण्याचे काम या दिंडोरी संस्थानातून होते असे कौतुक त्यांनी केले तसेच गोर-गरीब जनतेला कॅन्सर रोगावरील उपचार आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने हि जाण ठेऊन गुरुमाऊली मोरे दादा यांच्या आशीर्वादाने त्र्यंबकेश्वर नाशिक गुरुपीठ येथे भव्य कँन्सर हॉस्पिटल उभारण्यात आलेले आहे. चंद्रकांतदादा मोरे यांचे आरोग्यसेवेमध्ये मोठे योगदान आहे त्याचा सामान्य गोरगरीब जनतेने लाभ घ्यावा गुरुमाऊली नेहमी सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी झटत असतात. गुरुमाऊली मोरे दादा यांच्या वतीने देशभरात व देशाबाहेर स्वामी समर्थ केंद्र चालतात या ठिकाणी हिंदू संस्कृती टिकविण्याचे काम चालते देशभक्तीची शिकवण दिली जाते. जो केंद्रात जातो तो सेवेकरी होतो मोठमोठ्या अधिकाऱ्यांपासून आमदार-खासदार मंत्र्यांपर्यंत सर्व जाती धर्माचे लोकांना मुक्त प्रवेशाने सेवेकरी होत असतात मी आज येथे मन्त्री म्हणून नाही तर सेवेकरी म्हणून उपस्थित आहे श्री स्वामी समर्थ केंद्रातून ऊर्जानिर्मिती केंद्राप्रमाणेच कार्य चालते शेतीचे उत्पादन वाढावे आधुनिक पध्दतिची शेती करावी बी-बियाणे अवजारे कोणती वापरावी सेंद्रिय खाते, रासायनिक खते कधी किती प्रमाणात द्यावी पाणी किती द्यावे यासाठी गुरुमाऊली यांनी अभूतपूर्व ३ लाखाचं कृषी प्रदर्शन दिंडोरी येथे भरविल होत. आजचा कार्यक्रम हा ऐतिहासिक आहे असे वर्णन ना. लोणीकरांनी केले यावर्षी चांगला पाऊस पडून धनधान्य पिकू दे शेतकऱ्याचे उत्पन्न वाढून त्यांचे जीवनमान सुधारून राज्यातील शेतकरी आत्महत्या थांबू दे राज्यातील व देशातील शेतकरी कर्जमुक्त होऊ दे असे मागणे ईश्वराकडे मागितल्याचे लोणीकर म्हणाले सरकारचा प्रतिनिधी म्हणून मा मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांनी मला कार्यक्रमासाठी पाठविले जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून पाणी अडवून शेतीला उपयोगी ठरत आहे. शेतकऱ्याच्या मालाला बाजारभाव मिळवून देण्यासाठी मा. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात मंत्रिमंडळातील सर्व मंत्री प्रतिनिधी कटिबद्ध आहोत स्वामी समर्थ नेहमी सांगत भिऊ नकोशी मी तुझ्या पाठीशी आहे त्यामुळे शेतकरी भावानो भिऊ नका आलेल्या आस्मानी सुलतानी संकटाला धीराने सामोरे कारण श्री स्वामी समर्थ आपल्या पाठीशी आहे यावेळी परमपूज्य चन्द्रकांत दादा मोरे, विनोदराव बोराडे नगराध्यक्ष सेलू, भावनाताई नखाते, गुलाबराव लाटे, पन्कज निकम, सुरेश रोदगे, सचिन गोरे, अनिरूध्द कातारे, गणेश खवणे, अभिजीत रोडगे, अमोल भारस्कर, प्रसाद खारकर, ॲड महेश वाढेकर, डाॲ सुबोध माकोडे तसेच प्रचंड प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता