जिल्हाभरात धडाक्याने कारवाया होत असताना बदनापूर हद्दीत पोलिसांचा आशीर्वाद आहे का? देवगाव प्रतिनिधी :-पोलीस अधीक्षक म्हणून एस.चैतन्य रुजू झाल्या नंतर त्यांनी प्रथम धंद्याचे कंबरडे मोडून काढण्याला प्रधान्य दिले आहे अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या माध्यमातून सुरुवातीला वाळू माफिया,गुटका किंग,मटका किंग, जबर बसविण्यात आला जोडीला पोलीस आधीक्षकांचे विशेष पथकही धडाकेबाज कारवाया करत असल्याने अवैध धंदेवाल्यांची पळता भुई थोडी झालेली आहे.मात्र बदनापूर पोलीस ठाणे हद्दीत अशी एखादी धडाकेबाज कारवाई करत असल्याने अवैध धंदेवल्यावर कारवाई झल्याचे ऐकिवात नाही या हद्दीत अवैध धंद्याचे नुसता धुमाकूळ सुरु आहे . बासथांबे,किराणा दुकान,पानटपऱ्यावर, खुलेआम दारू विक्री होत आहे. कुठेही वाहनातून वातरल्यावरच स्टॉपवर हमखास दारू मिळते. एक-दोन जण सकाळी-सकाळी दुचाकीने या अड्या वर देशी-विदेशी दारू पाहूचवितात या बरोबरच महामार्गलगतच्या ढाब्यावर किंवा ढाभ्यालगतच्या पानटपऱ्यावर देशी-विदेशी दारू राजरोजपणे विकली जात आहे. तसेच वाळूची चोरी बदनापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुलेआम होत असतांना वरिष्ठ अधिकाऱ्यांचे बदनापूर पोलीस ठाण्याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. या हद्दीत वाळूचे मीटर असून जाफराबाद टेम्बूर्णीप्रमाणेच वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लोकेशनची माहिती देण्यासाठी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे आहेत. याच कर्मचाऱ्यामार्फत रात्री गाड्या सुरक्षितरित्या सोडून खिसे भरले जात आहेत. नव्या दमाच्या पोलीस अधीक्षकासह अप्पर पोलीस अधीक्षकांच्या धडाकेबाज कारवाया मुळे सर्वत्र चैतन्य निर्माण झालेले असताना बदनापूर हद्दीतील नागरिकांच्या चहऱ्यावर मात्र समाधान दिसून येत नाही. बदनापूर ठाण्याच्या हद्दीत कारवाया न होणे म्हणजे त्यांना माहित नाही का ? नासेल तर यंत्रणा काय कामाची ? काय बदनापूर हद्दीत रामराज्य आहे का ? असे एक ना अनेक प्रश्न या निम्मीतीने उपस्थित करण्यात येत आहे. तरी पण बदनापूर पोलिसाचे याकडे सोयीस्कर दुर्लक्ष दिसून येत आहे. जाफराबाद प्रमाणेच बदनापूर ठाणे हद्दीतही वाळू चा अवैध धंदा जोमात सुरु असला तरी आतापर्यंत एकही पोलीस कारवाई झालेली नाही आहे. पोलीस निरीक्षकांच्या मर्जीतले पोलीस कर्मचारी वारिष्टाचे लोकेशन घेऊन वाळूच्या गाड्या सुरक्षीतपणे सोडतात. हि बाब वरिष्ठांच्या कशी लक्षात येत नाही. आसा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे गुटका हि गल्लीबोळीतील दुकानावर,पानटपऱ्यावर खुलेआम मिळतो मध्यंतरी जालना शहरात पकडलेला ५० लाखाचा गुटका इतर ठिकान्याहुन जालना शहरात पाहुचेपर्यंत बदनापूर पोलीसचे अधिकारी-कर्मचारी झोपेत होते का? आसा प्रश्न पडतो. अवैध धंद्यावर कारवायासाठी पोलीस आधीक्षकांचे तसेच अप्पर पोलीस अधीक्षकांचे सरसावली आहेत. जिल्हाभरात या पथकामार्फत सुरु आसलेल्या कारवायांचे सर्वत्र स्वागत होत आहे. मात्र बदनापूर ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे सुरु नाही असे म्हणणे चुकीचे ठरेल एवढे कर्तव्यदक्ष अधिकारी असताना त्यांना या अवैध धंद्याची माहिती नसावी ; मग यंत्रणा काय कामाची? बदनापूर हद्दीत रामराज्य आहे का? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.