परतूर येथे काँग्रेस कमिटीच्या वतीने आज भव्य मोर्चा परतुर प्रतिनीधी-भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे वतीने परतूर मंठा विधानसभा मतदारसंघात शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी मा. आ. सुरेशकुमार जेथलिया यांच्या नेतृत्वा खाली व काँग्रेस पक्षाचे जेष्ट नेते मा. आमदार भाई जगताप यांच्या उपस्थितीत शेतकरी संघर्ष मोर्च्याचे आयोजन करण्यात आलेले असून या साठी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन परतूर-मंठा-नेर-सेवली काँग्रेस मिटीच्या वतीने करण्यात आले आहे.दि .११/१०/२०१८ गुरुवार रोजी बालाजी नगर ते उपविभागीय कार्याल्यावर मोर्चा निघणार आहे. या शेतकरी संघर्ष मोर्च्यात परतूर-मतदार संघात दुष्काळ जाहीर करा,मतदार संघात होत असलेला वीज भारनियमन तात्काळ बंद करा या प्रमुख मागण्या सह अनेक मागण्या करण्यात आले आहे. तरी शेतकर्यानी सदर मोर्च्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन परतूर-मंठा-नेर-सेवली काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.