पॅकेजिंगमधील संधी- देवेंद्र भुजबळ भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, अंतर्गत इंडियन इन्स्टिटयुट ऑफ पॅकेजिंग ही स्वायत्त संस्था असुन पॅकेजिंगमधील शैक्षणिक अभ्यासक्रम डिप्लोमा इन पॅकेजिंग 23 वी बॅच 2018-19 दूरस्थ अभ्यासक्रमाव्दारे सुरु होत आहे. हा अभ्यासक्रमा द एशियन पॅकेजिंग फेडरेशनव्दारे मान्यता प्राप्त आहे. या अभ्यासक्रमाचा कालावधी 18 महिने आहे. या अभ्यासक्रमासाठी उमेदवार यूजीसी मान्यताप्राप्त विद्यापीठांमधील विज्ञान, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, वाणिज्य, कलामधील पदवीधारक आणि / तंत्रज्ञान मंडळाच्या मान्यताप्राप्त अभियांत्रिकी/ तंत्रज्ञान पदविकाधारकपात्र असावेत. उमेदवारांना उत्पादन, पणन, क्वालिटी कन्ट्रोल इ. यांसारख्या प्रवर्तनात्मक औद्योगिक अनुभव एक वर्षाचा असावा. अर्ज स्वीकारण्याचा शेवटचा दिनांक 31 डिसेंबर 2017 आहे. पॅकेजिंगमधील तीन महिने कालावधीचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम (विकेण्ड क्लास):दिनांक 1 डिसेंबर 2017 ते 28 फेब्रुवारीपर्यंत असा कालावधी आहे. या अभ्यासक्रमासाठी उमेदवार यूजीसी मान्यताप्राप्त विद्यापीठांमधील विज्ञान, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, वाणिज्य आणि कलामधील पदवीधारक आणि / तंत्रज्ञान मंडळाच्या मान्यताप्राप्त अभियांत्रिकी/ तंत्रज्ञान पदविकाधारकपात्र असावेत. उमेदवारांना उत्पादन, पणन, क्वालिटी कन्ट्रोल इ. यांसारख्या प्रवर्तनात्मक औद्योगिक अनुभव एक वर्षाचा असावा. प्रवेश प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर मिळेल. "फ्रेश आणि प्रोसेस फूड" पॅकेजिंगवर दिनांक 12-13 ऑक्टोबर 2017, दोन दिवसांचा अभ्यासक्रम मल्टिपर्पज हॉल, आयआयपी, मुंबई, येथे आयोजित करण्यात आला आहे. पॅकेजिंगशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे संबंधित असलेले पॅकेजिंग साहित्य उत्पादन/कन्व्हर्टर्स/ युजर इंडस्ट्रीज,पॅकेजिंग मशिनरी उत्पादक, रिसर्च आणि डेव्हलपमेन्ट क्वॉलिटी ॲश्युरन्स, खरेदी आणि नियोजन, विक्री आणि पणन इ. साठी हा अभ्यासक्रम उपयोगी आहे. अधिक माहितीसाठी संस्थेच्या www.iip-in.com या संकेतस्थळास भेट द्यावी. संपर्कासाठी पत्ता - द इंडियन इन्स्टिटयुट ऑफ पॅकेजिंग, इ-2,एमआयडीसी एरिया, पोस्ट ऑक्स नं. 9432, अंधेरी (पूर्व), मुंबई-400 093 दूरध्वनी 022-28219803 /6751/9469, 28391506,28329623,28254631 एक्सटेन्शन नं-302,303,304 आणि 305 फॅक्स क्रमांक 022-28328178/28375302 यावर संपर्क साधवा. ई-मेल – rneiip@iip-in.com ,pgdpiip@iip-in.com,