कर्णपुरा देवी नवरात्रोत्सवाला आजपासून सुरवात पहाटे पासून देवीच्या दर्शनासाठी भविकांची गर्दी संभाजीनगर शहरा चे ग्रामदैवत कर्णपुरा देवी नवरात्र उत्सवाला आजपासून यात्रेची सुरुवात झाली असून , पहाटे ३:०० वाजता देवीची महापूजा सकाळी ७:०० वाजता महाआरती ७:३० वाजता घटस्थापना संस्थापक अध्यक्ष अंबादास दानवे कुटुंबांच्या हस्ते करण्यात आली . याप्रसंगी अंकुश दानवे, संतोष दानवे ,करणसिंग काकस ,राजू राजपूत, संतोष मरमट, ओमकार देवतवाल, नंदू लबडे अभिजीत पगारे, संजय लोहिया, नारायण कानकाटे, जगन्नाथ दानवे ,सुरेश दानवे, पोपट दानवे आदींची उपस्थिती होती