विभागीय लोकशाही दिनी 5 अर्जांवर सुनावणी औरंगाबाद,-येथील विभागीय आयुक्त कार्यालयात आज आयोजित विभागीय लोकशाही दिनात एकुण 5 अर्ज दाखल झाले असून या सर्व अर्जावर सुनावणी करण्यात आली.यावेळी मागील प्रलंबित अर्जांवर चर्चा करण्यात आली. लोकशाही दिनात एकूण 5 अर्ज दाखल होते त्यात उपसंचालक भूमी अभिलेख -1, उप आयुक्त विकास (आस्थापना)-1, प्रादेशिक उपसंचालक न.प.प्र.-1, विभागीय सह निबंधक सहकारी विभाग-1, जिल्हाधिकारी -1 , ही प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढण्याच्या सुचना यावेळी संबंधितांना विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर यांनी दिल्या.यावेळी उपायुक्त वर्षा ठाकूर, सूर्यकांत हजारे, पारस बोथरा, अपर जिल्हाधिकारी पी.एल सोरमारे, यांच्यासह संबंधित विविध यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.