मुलीची छेड काढल्या प्रकरणी परतूरात एकाचा मृत्यू. परतूरबंद वातावरण तणावपूर्ण. परतुर-मुलीची छेड काढल्या प्रकरणी एकाचा परतुरात मृत्यू झाला असून. मयताच्या पत्नी रुक्मिण तुकाराम आढाव यांच्या फिर्यादीवरून परतूर पोलिसांनी,चारजणांवर गुन्हा दाखल केला असून,1 आरोपी शेख अब्दुल , 2 शेख अहमद,3 शेख फजलू, 4 शेख सलीम,राहणार वखार महामंडळ परतुर, घटना घडली तारीख वेळ ठिकाण, दिनांक 6 ऑकटोबर 2018 रोजी, सहा ते सात च्या दरम्यान ही घटना घडली, परतूर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार काहीही कारण नसताना आरोपींनी फिर्यादीच्या घरी जाऊन फिर्यादीस एकटी पाहून तुझी पप्पी घेऊ का? असे बोलून फिर्यादीच्या विनयभंग केला, व तुझा नवरा तुकाराम आढाव आहे. असे विचारून गल्लीतल्या चौका जवळ गेला असता तेथे तुकाराम आढाव वय तीस हा भेटल्याने त्यास काठीने मारीत मारीत फिर्यादीच्या घरा समोर आणले, व तेथे वरील सर्व आरोपीने फिर्यादीच्या नवरयास, काहीही कारण नसताना, कारण नसताना पायावर डोक्यावर अंगावर मारहाण केली, मारहाण झाल्यामुळे मारहाण झाल्यामुळे आरोपी बेशुद्ध झाला, परतूर पोलिसांनी त्याला उपचारार्थ परतूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, तेथून डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले, जिल्हा रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला, या प्रकरणी पोलिसांनी चार लोकांना अटक करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर केला असून कलम 143, 147, 148, 354 (अ) व 302, असा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक रेंगे करीत आहे. अशी माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली आहे. याबाबत या घटनेसंदर्भात आरोपींच्या नातेवाईकांनी पोलीस निरीक्षक यांना निवेदन सादर केले असून निवेदनात असे म्हटले आहे की, माझे भाऊ नंबर अब्दुर्रहमान शेख जमीर, नंबर 2 शेख अहमद शेख जमीर, व इतर दोन लोक यांना पोलिस स्टेशन परतूर येथे पोलिसांनी विनाकारण ठाण्यात आणून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे, निवेदनात असा उल्लेख करण्यात आला आहे कि माझे भाऊ वखार मंडळ परतुर येथे राहतात यांनी आरोपी नंबर एक तुकाराम रामचंद्र आढाव नंबर दोन सत्य व एकाचे नाव माहिती नाही असे तीन जणांविरुद्ध मुलगी सकीना अब्दुर रहमान वय बारा वर्ष, हीस मानसिक त्रास दिला असे की वरील एक ते तीन आरोपी विरुद्ध तक्रार अर्ज दिला होता, दिनांक 7 /2018 रोजी ठीक सहा ते सात च्या दरम्यान या इसमाने दारूच्या नशेत मुलीस छेडछाड केली होती, यावेळेस माझ्या भावांना व त्या गल्लीतील पाच ते सहा लोकांनी समजून घालून त्यांना परतूर पोलीस स्टेशन येथे, अंदाजे सात ते आठ वाजता हजर केले होते, हजर करताना पोलीस स्टेशन परतूरच्या सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये नोंद झालेली असून ती सार्वजनिक करण्यात यावी, तक्रारीनुसार पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही ती आम्हाला माहित नाही, आम्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात देऊन परत आमच्या घरी निघून गेलो, आरोपी पोलिसांच्या ताब्यात असताना फिर्यादी व आरोपीची भेट झाली नाही, असे की तुकाराम रामचंद्र आढाव यांच्या मृत्यूबाबत व त्यांचे भाऊ यांचा कोणता संबंध नाही, असे की फिर्यादी शेख अब्दुल रहमान शेख जमीर यांची अल्पवयीन मुलीस मानसिक असे त्रास दिला आहे तक्रार दिल्यानंतर, तक्रारीनुसार योग्य ती कारवाई झाली किंवा नाही सांगण्यात आले नाही, तक्रारीत तीन लोकांच्या नाव असताना, या लोकांवर कोणता गुन्हा दाखल केला आहे काय, या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी होऊन कारवाई करण्यात यावी, व फिर्याददार व इतर यांच्यावर कारवाई करण्याचा प्रश्न निर्माण होत नाही, करिता योग्य न्याय देण्यात यावा, करिता निवेदन सादर करीत आहोत, निवेदनाच्या प्रती माननीय उपविभागीय अधिकारी परतुर, तहसीलदार परतूर, पोलीस उपविभागीय अधिकारी परतुर, यांना देण्यात आलेले आहे,अशी एकूण परिस्थिती आहे. या घटनेसंदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता असे समजले की हा पूर्ण प्रकरण उलटला असून ज्या लोकांनी छेडछाड केली त्यांच्याविरुद्ध रीतसर परतूर पोलीस ठाण्यात त्याच्या नातेवाईकांनी तक्रार दाखल केलीहोती, परंतु या तक्रारीची नोंद परतूर पोलिसांनी घेतली नाही, व ज्या वेळेस पोलीस ठाण्यात या आरोपींना मारहाण करण्यात आली, आरोपी दारूच्या नशेत होते, यामुळे एक सदरील आरोपी मार लागल्यामुळे बेशुद्ध अवस्थेत परतूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला होता, परतूर येथील ग्रामीण रुग्णालयातून त्यास जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले, व या ठिकाणी या आरोपींचा मृत्यू झाला असे समजले आहे.याघटने मुळे परतूर शहरात तणावपूर्ण वातावरण झाले आहे, या घटनेच्या निषेधार्थ परतूरबंद ठेवण्यात आले होते ,पोलिस चोख बंदोबस्त ठेवून आहेत.