बळीरामजी कडपे यांचा भव्य नागरी सत्कार... आष्टी / प्रतिनिधी परतूर तालुक्यातील आष्टी येथील बळीरामजी कडपे यांची नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महाराष्ट्र सरचिटणीस पदी निवड झाली.त्याचेच औचित्य साधून दि.08 रोजी आष्टी व आष्टी परिसरातील नागरिक तसेच पक्षाच्या कार्यकर्त्याने भव्य सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता.यावेळी या कार्यक्रमाला कपिल भैया आकात,रमेशराव सोळंके,मीठे महाराज,शिवाजीराव सवने, सादेकभाई जाहागिरदार ,भगवानराव थोरात,रहेमतखान पठाण,भगवान कांबळे,बाबुराव पवार, मनोज सोळंके( सरपंच )राजुभाऊ आघाव, बाबासाहेब बागल, शिवा आप्पा खिस्ते शहर अध्यक्ष आष्टी, शिवलिंग शेंटे , विक्रम पोटे,गौतम शेळके, यांच्या सह असंख्य आष्टी येथील कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. सत्कार प्रसंगी बोलताने कडपे म्हणाले की,पक्षाने दिलेल्या पदाला परिपूर्ण न्याय देण्याचे काम करणार असून,येत्या आठ दिवसात महावितरण कार्यालयाने लाईटचा पुरवठा हा सुरळीत केला नाही तर अंदोलन करण्यात येणार असून,शेतकऱ्यासाठी वेळप्रसंगी माझ्यावर गुन्हे दाखल झाले तरी आता माघार घेणार नाही . पुढे बोलताने ते म्हणाले की,गेल्या काही दिवसापासून आपल्या तालुक्यात गलिच्छ राजकारण केल्या जात आहे .खोटे गुन्हे दाखल करून विरोधकांना नामोहरम करण्याचा षडयंत्र सत्तेतील लोक करत असून,काही मंडळी दुसर्याच्या खांद्यावर बंदूक ठेऊन निशाणा साधत आहेत.पंरतु ज्या दिवशी ती बंदूक तुमच्या खांद्यावर येईल त्या दिवशी तुमचीच गोळी तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही असा इशारा त्यांनी यावेळी सत्ताधारी यांना दिला. तालुक्यातील राजकारणाची दशा आणि दिशा बदल्याणासाठी पक्षाने माझ्यावर विस्वास टाकून एवढी मोठी जबाबदारी दिली आहे. ती इमाने इतबारे काम करून पक्षाने दाखवलेला विस्वास येत्या काही काळातच सार्थ ठरवून, येत्या निवडणुकात सत्तेने धुंद झालेल्या सरकारची मस्ती उतरून दाखवण्याची शपथ सिद्धेश्वर मंदिरात घेतली.व दि 11 रोजी होणाऱ्या काँग्रेस पार्टीच्या परतूर तालुका दुष्काळ जाहीर करण्याच्या मोर्च्याला पाठींबा जाहीर करत,हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते यांना हजर राहण्याचे आव्हान केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परमेश्वर पोटे सत्तार कुरेशी यांनी केले.