“ निरोगी आयुष्यासाठी योग्य आहार व व्यायाम हीच गुरूकीली” डॉ. आजित भाले याचे उद्गार! लायन्स क्लब औरंगाबाद वाळूज व लायन्स क्लब सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने दी. ५/१०/२०१८ रोजी उस्मानपुरा येथे मधुमेह शिबीर आयोजित केले होते. कार्यक्रमाच्या आध्यक्षस्थानी वाळूज क्लब चे अध्यक्ष श्री. अशोक जगधने होते. सचिव श्री. दत्तात्र्य देशपांडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले, अडव्होकेट श्री. शांतिलाल छापरवाल यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करुण आजच्या उपक्रमाचे महत्व पटवून दिले. या कार्यक्रमाचे प्रोजेक्ट चेअरमन श्री. राजेन्द्रसिंह रकवाल यांनी कार्यक्रमाची माहिती दिली. या प्रसंगी झोनल चेअरमन श्री. जिंतेद्र महाजन, लायन श्री. अशोक गुरनाळे, श्री. चेतन अग्रवाल, रिजन-५ चे रिजनल चेअरमन अडव्होकेट अनूप धानुका, अलोक अग्रवाल, संतोष पगारिया, सुहास कोटेचा, मनीष भंडारी, शेलेन्द्र मल्हार, रजनीश कटारिया, सुनील अग्रवाल, राघवेंद्र बगड़िया आदि मान्यवर व इतर रुग्ण मोठया प्रमाणावर उपस्थित होते .या प्रकल्पाचे उद्घाटक डाक्टर अनिल भाले मार्गदर्शन करताना म्हणाले की जागतिक स्तरावर मधुमेह व हृदय रोगाचे प्रमाण वाढले आहे. डॉ. भाले यांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या विभागत बारा वर्ष अधिवीख्यात म्हणुन काम केले आहे. ते म्हणाले की मधुमेह व हृदय रोग व उच्च रक्तदाब हे मानवाच्या आयुश्यातील मोठे आजार आहेत व प्रत्येकाने त्या दृष्टीने स्वताची काळजी घेणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन केले. लायन श्री. अशोक गुरनाळे यांनी सर्वांचे आभार मानले.