वाळू माफियांना खबर देणाऱ्या महसुल कर्मचार्याच्या बदल्या करा देवगांव -कार्यवाही करण्यापूर्वीच वाळू माफियांना सावध करणाऱ्या महसुल कर्मचारी यांच्या बदल्या कराव्या आशी मागणी जोर धरत आहे. तहसील कार्यालयात कार्यरत काही महसुल कर्मचारी, तलाठी, मंडळ अधिकारी, सह. दलाल मंडळी येथे उपस्थित असतात गौण खनिज पथक आज कोणत्या भागात जाणार हे पथक तहसील कार्यालयातून निघाले की वाळू माफियांना फ़ोन करुण सांगितले जातात गौण खनीज पथक हे आमच्या कार्यालयातून निघाले ते कोणत्या ही क्षणि तुमच्या पर्यंत पहुचु शकतात यामुळे दुधना नदी, लाहूकि नदीच्या पात्रातील अवैध रेती उपसा करणारे भामठे भूमीगत होतात त्यातच अवैध वाहतूक करणारे टिप्पर व ट्रेक्टर सुरक्षीत ठिकाणी उभ्या केले जाते किंवा रिकामे केल्या जाते अश्या प्रकारे अकोला निकळक, बदनापुर, देवगांव, रोशनगांव, सायगांव , कुंभारी, ढोकसाळ, पिरसावंगी सह बावने पांगरी नजीक पांगरी भागात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरु आहे वाळू माफियाला खबर देणाऱ्या कर्मचार्याची तत्काल बदली करावी आशी मागणी होत आहे