लोकशाही बळकट करण्‍यासाठी तरुणांनी योगदान दयावे- रविंद्र बिनवडे जालना - भारत हा तरुणांचा देश असुन या देशात लोकशाही बळकट करण्‍याठी तरुणांनी अधिकाधिक निवडणूक प्रक्रियेते भाग घ्‍यावा असे प्रतिपादन जिल्‍हाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी केले आहे. आज दिनांक ०३ ऑक्‍टोबर २०१८ रोजी जे.ई.एस. महाविदयालयात निर्वाचन साक्षरता मंचच्‍या उदघाटन प्रंसगी जिल्‍हाधिकारी बोलत होते. यावेळी व्‍यासपिठावर उप-जिल्‍हा निवडणूक अधिकारी संगिता सानप, उप विभागीय अधिकारी केशव नेटके, म‍हाविदयालयाच्‍या प्राचार्य जवाहर काबरा यांची उपस्‍थीती होती. यावेळी मार्गदर्शन करताना जिल्‍हाधिकारी बिनवडे म्‍हणाले की, भारतीय लोकशाहीचा खरा आधारस्‍तंभ हा पारदर्शक होणा-या निवडणूका हा आहे. निवडणूक प्रक्रियेत प्रत्‍येकाला मतदानाचा हक्‍क संविधानाने दिला असून प्रत्‍येकाने पालन करावे कारण प्रत्‍येकाच्‍या मताचे मूल्‍य हे सारखेच असते व त्‍यावरच आपली लोकशाही जगात प्रथम क्रमांकावर आहे. सन २०१९ मध्‍ये होणा-या लोकसभा निवडणूकीसाठी निवडणूक आयोगाने सुलभ व पारदर्शक निवडणूक प्रक्रिया हे ब्रिद वाक्‍य घेउन प्रत्‍येक नागरिकाला मतदानाचा हक्‍क बजावता येईल. यासाठी विशेष काळजी घेतली जाईल. सध्‍या ०१ सप्‍टेंबर ते ३१ ऑक्‍टोबर दरम्‍यान विशेष संक्षिप्‍त पूनरिक्षण कार्यक्रम सुरु असून यात जास्‍तीत जास्‍त नवीन तरुण मतदारांनी आप आपली नावे मतदार यादीत नोंदवावीत. सोबतच आपल्‍या मतदानाची खात्री मतदाराला व्‍हावी यासाठी व्‍हीव्‍हीपॅट हे नवीन मशीन यावर्षी पासून निवडणून आयोगाने तयार केले आहे. याद्वारे आपण कोणत्‍या उमेदवाराला मतदान केले आहे. याची खाञी मतदाराला होईल असे श्री. बिनवडे शेवटी म्‍हणाले.यावेळी ०१.०१.२०१९ या अर्हतादिनांकावर १८ वर्षे पुर्ण करणा-या मुलांच्‍या नाव नोंदणीसाठी जिल्‍हानिवडणूक कार्यालयाच्‍या वतीने जे.ई.एस. महाविदयालयात ४ दिवस ऑनलाईन नोंदणीचे शिबीर आयोजीत केले हेाते. यात १०१ मुलांची नाव नोंदणीची प्रक्रीया पुर्ण करण्‍यात आली.कार्यक्रमाच्‍या यशस्‍वीतेसाठी महाविदयालयातील प्राध्‍यापक डॉ. राजेंद्र सोनवणे, डॉ. उमेश मोराळे, डॉ.के.जी. सोनकांबळे, प्रा. भाग्‍याश्री बियाणी, प्रा. पवार, बिरकायूलू, तोटरी, प्रा. लेांढे, एन.एस.एस. चे विदयार्थी राहूल घुले, श्‍याम भाकड, प्रदिप गायकवाड ,शेख यास्‍मीन, बीलओ देऊळगावकर यांनी प्रयत्‍न केले. कार्यक्रमाचे सुञसंचालन डॅा.वसंत पवार यांनी केले प्रास्‍ताविक डॉ. गणेश कुलकर्णी यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. राजेंद्र सोनवणे यांनी केले. असे उपजिल्‍हा निवडणूक अधिकारी, जालना यांनी कळविल आहे.