109 औरंगाबाद पुर्व विधानसभा मतदार संघातील मतदारांना जाहीर आवाहन औरंगाबाद, –१०९ औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदार संघातील मतदारांना आवाहन करण्यात येते की, AURANGABAD GOV.IN या जिल्हाधिकारी कार्यालय, औरंगाबाद यांचे संकेतस्थळावर विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादी क्र. १ मधील मयत, दुबार, स्थलांतर, मतदार यादीत छायाचित्र नसलेले मतदार, कृष्णधवल छायाचित्र असलेले मतदार यांच्या नावांची मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या अहवालानुसार मतदार यादीतून वगळणी केलेली आहे. तसेच यादी क्र . २ मधील मतदार यादीत छायाचित्र नसलेले मतदार, कृष्णधवल छायाचित्र असलेले मतदार यांची स्थळपाहणी केली असता यापैकी जे मतदार यादीभागाच्या परिसरात आढळून आलेले नाहीत अशा मतदारांची मतदार यादीतून वगळणी करावयाची आहे.तरी याबाबत काही हरकत असल्यास अशा मतदारांनी आवश्यक त्या कागदपत्रांच्या पुराव्यानिशी १०९ औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदार संघ, तहसील कार्यालय, औरंगाबाद येथे १५ दिवसांच्या आत प्रत्यक्ष हजर रहावे. अन्यथा सदरील यादीतील मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात येतील, असे आवाहन तहसीलदार तथा सहाय्यक मतदारनोंदणी अधिकारी, औरंगाबाद यांचेतर्फे करण्यात आले आहे .