बदनापूर/ विविध निवडणुकीच्या वेळी आरक्षित जागेवर निवडणूक लढविणाऱ्या उम्मेदवाराना जात वॆधता प्रमाणपत्र निवडून आल्यानंतर सहा महिन्यात सादर करण्याचे शपथपत्र उम्मेदवारी अर्जासोबत दिले जाते परंतु निवडून आल्यानंतर अनेक जण जात वैधता प्रमाणपत्र सादर करीत नाही अश्या लोकप्रतिनिधींचे पद रद्द करण्याचे आदेश सर्वाच्च न्यायालयाने दिल्यानंतर लोकप्रतिनिधी मध्ये खळबळ माजली असून बदनापूर नगर पंचायत मधील चार नगरसेवकांचे पद धोक्यात आले असून या मध्ये दोन राष्ट्रवादी आणि दोन अपक्ष नगरसेवकाचा समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेली कोल्हापूर महापालिकेतील नगरसेवकांची याचिका (स्पेशल लिव्ह पिटिशन) गुरुवारी खंडपीठाने फेटाळली. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या एका आदेशानुसार महापालिकेतील १९ नगरसेवकांचे पद नियमानुसार रद्द झाले आहे. निवडून आल्यानंतर सहा महिने मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र न दिल्याने त्यांना हा फटका बसला होता. दरम्यान, तेथील सर्वांचे जातीचे दाखले वैध ठरले आहेत. परंतु, त्यांनी मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र दिलेले नसल्यामुळे त्यांची पदे रदद झालेली आहे. राज्यभरासाठी आदेश लागू होणार असल्याने निर्णयाचा चेंडू राज्य शासनाच्या कोर्टात आला आहे. न्यालयाच्या निर्णयानंतर राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना पात्र पाठवून अश्या नागरसेवकांविरुद्ध काय कारवाई केली याबाबत तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे ,बदनापूर नगर पंचायत मध्ये राष्ट्रवादीचे न्यामतबी शेख अय्युब ,परवीन सय्यद व अपक्ष नसरीन कुरेशी हे इतर मागासवर्गीय प्रवर्गातून तर प्रीती साबळे हे अनुसूचित जाती प्रवर्गातून निवडून आलेल्या असून या चार महिला नगरसेवकांनी दिलेल्या शपथपत्रानुसार सहा महिन्याचा कालावधी उलटलेला असतांना जात वैधता प्रमाणपत्र सादर केलेले नसल्यामुळे योग्य त्या कारवाईसाठी अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आलेला असून या चार महिला नगरसेवकांची पदे धोक्यात आली आहे . बदनापूर तालुकयातीलही अनेक ठिकाणच्या निवडणुकांत अनेकांनी जात पडताळणी प्रमाणपत्रे सहा महिन्यात सादर करण्याचे शपथपत्रे निवडणूक आवेदनपत्रात लिहून दिलेले होते. निवडणुका झाल्या अनेक शपथपत्रे दिलेले निवडून आले. त्यापैकी काहींनी मुदतीचया आत जात पडताळणी प्रमाणपत्रे सादर केली पण अनेकांनी सहा महिने उलटून गेली तरी जात पडताळणी प्रमाणपत्रे सादर केली नाहीत तर जास्तीत जास्त राजकारण्यांनी मात्र सहा महिने उलटल्यानंतरच प्रमाणपत्रे सादर केलेली आहे. त्यामुळे सहा महिन्याचे शपथपत्र मात्र खोटे ठरत आहे. नगर पंचायत मध्ये राष्ट्रवादीचे सहा नगरसेवक असून आता दोघांची पदे जाणार असल्याने राष्ट्रवादीचे चार सदस्य राहणार आहेत विशेष म्हणजे काही दिवसापूर्वी झालेल्या नगराध्यक्ष निवडणुकीत राष्ट्रवादीचे परवीन सय्यद ,उजमा काजी व काँग्रेसचे युनूस शेख ,आशाबेगम शेख यांनी बहजप उम्मेदवार प्रदीप साबळे यांना मतदान केल्याने त्यांच्याविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार झालेली असून त्या प्रकरणाची देखील सुनावणी होणार असल्याने आणखी तीन सदस्यांची पदे धोक्यात आहे.