आजारी रुग्णाला मदत,जिल्हा परिषद सदस्य इंद्रजीत घनवट यांचा सामाजिक उपक्रम. परतूर तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य यांनी सर्कल मधील पंधरा ते वीस दुर्धर आजारावर रुग्णांना जिल्हा परिषद मार्फत मिळणाऱ्या आर्थिक मदतीचे धनादेश वाटप केले असून दुर्धर आजाराने ग्रस्त रुग्णांना जिल्हा परिषदच्या आरोग्य विभागा मार्फत आर्थिक मदत करण्यात येते,यांसाठी परिसरातील काही प्रस्ताव आले होते, त्यामुळे गरजू लाभार्थ्यांना अनुदान मिळावे यासाठी जिल्हा परिषद सदस्य यांनी पुढाकार घेत त्यांना आर्थिक मदत मिळवून दिली, येथे सोमवारी झालेल्या कार्यक्रमात लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप करण्यात आले, मुद्रिका नारायण पवार, पुष्पा मुगाजी शेजुळ शिरसगाव, कोंडाबाई भिमराव सवने. आबासाहेब टकले, दिपक ढवळे कोकाटे हादगाव, छायाबाई मधुकर कोकाटे, एकनाथ शिंदे कलीमाबी अहमद शेख रोहीना, शेख खाजा शेख दाऊद, गणपत भाऊराव, आसाराम लोखंडे, अजित सय्यद हसन सय्यद, यांचा यामध्ये समावेश आहे, जिल्हा परिषदच्या इतर फंडातून निधीचे वाटप गरजू रुग्णांना करण्याची मागणी रुग्णांच्या नातेवाईकांनी केली होती. म्हणून जिल्हा परिषद सदस्य घनवट यांनी पुढाकार घेत लाभार्थ्यांना आर्थिक मदत मिळवून दिली, या सामाजिक कार्यामुळे सर्वत्र त्यांचे कौतुक करण्यात येत आहे, घनवट हे सातोना मतदार सातोना सर्कल मधील काँग्रेस पक्षाचे एकमेव जिल्हा परिषद सदस्य असून त्यांनी आपल्या मतदारसंघात लोकांसाठी अनेक व विविध उपक्रम राबवले आहेत सामाजिक कार्यात त्यांचा मोठा वाटा आहे ते सदैव लोकांच्या कामासाठी तत्पर राहतात अनेक लोक त्यांच्याकडे आपले काम घेऊन व समस्या घेऊन येत असतात या सामाजिक कार्यातून पहिलं पहिल्यांदाच त्यांनी सर्कल मधील जिल्हा परिषद निवडणूक लढविली होती व त्यात ते निवडणुकीत विजय झाले होते.